Milk Production

Milk Production । पशुपालकांनो, स्वच्छ दूध उत्पादनासाठी घ्या ‘ही’ काळजी

पशुसंवर्धन

Milk Production । दुधाकडे पूर्ण अन्न म्हणून पाहिले जाते, आरोग्यासाठी दूध खूप फायदेशीर असते. डॉक्टरदेखील दूध खाण्याचा सल्ला देतात. दुधापासून अनेक पदार्थ बनवले जातात. दूध उत्पादनाच्या बाबत बोलायचे झाले तर भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. तसेच दूध (Milk) हा नाशवंत पदार्थ आहे. रोगजंतूंचा प्रवेश होऊन दूध खराब होते. त्यामुळे त्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचे आहे.

Havaman Andaj । सावधान! राज्यासह देशातील या भागात पडणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिला इशारा

जनावरांची घ्या काळजी

जनावरांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. दुभती जनावरे वेगळी ठेवावीत, धार काढत असताना कोमट पाण्यात पोटॅशियम परमॅग्नेटचे खडे टाकून ते कास धुवून काढावेत. असे केल्याने जनावर पान्हा लवकर सोडते. धार काढल्यानंतर ३० ते ४० मिनिटे सडांची छिद्रे उघडी असतात. त्यामुळे जनावरांचे सड ३ ते ४ टक्के रोगजंतुनाशक औषधात बुडवावीत.

Government Schemes । शेतकरी बांधवांनो, होईल फायदाच फायदा! त्वरित करा हरितगृह, ट्रॅक्टर आणि कांदाचाळीसाठी अर्ज

वापरण्यात येणारी भांडी

महत्त्वाचे म्हणजे दूध काढण्यासाठी तोंडाकडे निमुळती असणारी आणि जास्त खाचा नसणाऱ्या भांड्यांचा वापर करावा. दूध भांड्यात काढण्यापूर्वी ते भांडे स्वच्छ धुवून घ्यावे. तसेच वापरानंतर ते स्वच्छ धुवून घ्यावे.

Vegetable farming । भरघोस नफा मिळवायचा आहे? तर मग करा ‘या’ हिरव्या भाज्यांची लागवड

दूध दोहन प्रक्रिया

दूध काढताना मूठ पद्धतीचा वापर करावा. दोहनाची प्रक्रिया ७ ते ८ मिनिटात पूर्ण करावी. दोहनासाठी मशीनचा वापर करावा. अपूर्ण दोहन करू नये. चुकीच्या पद्धतीमुळे जनावराच्या सडाला इजा होण्याची शक्यता जास्त असते. ताज्या दुधात शिळे दूध मिसळू नये. शक्य तितक्या लवकर दुधाची विक्री करावी.

Land Rule । काय सांगता! शेतीचा बांध कोरला तर कारवाई होते? महत्त्वाचा नियम एकदा वाचाच

यांत्रिकीकरण

मिल्किंग मशीनचा वापर केल्याने दूध जंतूंच्या संपर्कात येत नाही. परंतु, त्या त्या यंत्राची स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे असते. जर यंत्र स्वच्छ ठेवले नाही तर दूध लवकर खराब होण्याची जास्त शक्यता असते.

Success Story । ऊसतोड कामगार बनला दोन कोटींचा बागायतदार, जाणून घ्या या शेतकऱ्याची थक्क करणारी कहाणी

दूध काढणारी व्यक्ती

दूध काढणारी व्यक्ती निरोगी आणि त्याचे कपडे स्वच्छ असावेत. विशेष म्हणजे त्याला धूम्रपानाची सवय नसावी. धार काढण्यापूर्वी त्याने आपले हात पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्यात बुडवून घ्यावेत. असे केल्याने जंतूंचा इतरत्र फैलाव होत नाही.

Agriculture News । शेजारील शेतकरी शेतात पाईपलाइन टाकू देत नसल्यास काय करावे? काय सांगतो कायदा? जाणून घ्या

जनावरांचा गोठा

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनावरांचा गोठा स्वच्छ असावा. त्यात हवा खेळती आणि सूर्यप्रकाश येणारी जागा असावी. गोठ्यात पाणी आणि मलमूत्र साचू देऊ नये. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य चढ आणि उतार असावा. तीन महिन्यातून एकदा गोठयात जंतुनाशक फवारावे.

Onion Price Hike । कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी! कांद्याच्या दरात विक्रमी वाढ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *