Cow Milk Rate

Milk Rate । सणासुदीच्या काळात पशुपालकांना मोठा धक्का, गाईच्या दूध दरात मोठी घसरण

पशुसंवर्धन

Milk Rate । सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. या दिवसात दुधाला चांगली मागणी असते. परंतु याच काळात दुधाचे दर (Milk Rate) प्रचंड कमी झाले आहेत. मागील काही दिवसांपासून दुधाचे दर कमी झाले असताना सणासुदीच्या काळात देखील दर कमी झाल्याने पशुपालक वर्ग अडचणीत आला आहे. दूध दरावरून पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Havaman Andaj । राज्याला अवकाळी पावसाचा फटका, ‘या’ जिल्ह्यांत होणार दमदार पाऊस

पुन्हा दरात घसरण

पाच-सहा महिन्यांपूर्वी गाईच्या दुधाचे दर ३८ रुपये इतके होते. परंतु ते आता थेट २७ रुपयांपर्यंत खाली आले आहे. महत्त्वाचे म्हणजे काही ठिकाणी २६ रुपये दर पाहायला मिळत आहे. यंदा देशातील अनेक राज्यात पाऊस कमी प्रमाणात झाला आहे. त्यामुळे पशुखाद्याचे दर खूप वाढले आहेत. पशुपालकांना चारा जास्त किमतीने विकत घ्यावा लागत आहे. एकंदरीतच दूध व्यवसाय (Milk Rate Falls Again) पुन्हा अडचणीत आल्याचे दिसत आहे.

Success Story । शेतकऱ्याचे नशीबच चमकले! दुष्काळी भागात केली ड्रॅगन फ्रूटची लागवड; मिळाला ३० लाख रुपयांचा निव्वळ नफा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सरकारकडून गाईच्या दुधाचे दर निश्चित करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने अभ्यास करून गाईच्या दुधाला कमीत कमी ३४ रुपये दर (Milk Rate Falls Down) देण्याचे निश्चित केले होते. यानुसार दूध संघांनी देखील २१ जुलैपासून ३.५ फॅट आणि ८.५ ‘एसएनएप’ला ३४ रुपये दर द्यायची घोषणा केली होती. परंतु रिटर्नचे दर वाढवून एसएनएफच्या प्रतिपॉईंटला ३० पैशाऐवजी १ रुपये व फॅटच्या प्रतिपॉईटला २० पैशांऐवजी ५० पैसे कपात सुरु केली.

Agriculture News । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी सरकार सोडणार तुमच्या खात्यावर पैसे

पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष

त्यामुळे पशुपालक कमालीचे नाराज झाले होते. अशातच आता पुन्हा हे दर पूर्वीप्रमाणे करण्यात आले आहेत. पशुसंवर्धनमंत्र्यासह सगळेच नेते याकडे लक्ष देत नाही. एकंदरीतच सरकारने नेमलेल्या समितीसह पशुसंवर्धन विभागदेखील याकडे दुर्लक्ष करत आहेत. पशुपालनाचा व्यवसाय पुन्हा एकदा धोक्यात आला असून आता याकडे सरकार कितपत लक्ष देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Animal Fodder । शेतकऱ्यांना मिळत आहे कमी किमतीत जनावरांसाठी हिरवा चारा, जाणून घ्या ऑर्डर कशी करावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *