Government Schemes

Government Schemes । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता दिवसाही मिळणार वीज

शासकीय योजना

Government Schemes । शेतकऱ्यांना अनेकदा वीज संकटाचा सामना करावा लागतो, पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. बऱ्याचवेळा पिके पाण्याविना जळून जातात. यावर्षी राज्याच्या अनेक भागात अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे राज्याला लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे. उपलब्ध पाणी वीज नसल्याने पिकांना देता येत नाही. अशातच आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Milk Rate । सणासुदीच्या काळात पशुपालकांना मोठा धक्का, गाईच्या दूध दरात मोठी घसरण

मिशन २०२५

अशातच सौर ऊर्जा तयार करून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना (Solar Agriculture Yojana) हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. यातून शेतकऱ्यांना भरदिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सौरऊर्जा वापरून ७००० मेगावॅट वीजनिर्मिती करणे तसेच २०२५ पर्यंत ३० टक्के कृषी फीडर्स सौरऊर्जेवर चालविणे असे ‘मिशन २०२५’ या अभियानाच्या माध्यमातून निश्चित केले आहे.

Havaman Andaj । राज्याला अवकाळी पावसाचा फटका, ‘या’ जिल्ह्यांत होणार दमदार पाऊस

दरम्यान, या अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केला होता. अंमलबजावणीवर महावितरणकडून भर देण्यात येत आहे. सौर ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदार उत्सूक असून यासाठी ज्या वेगाने जमिनी उपलब्ध होतील त्या वेगाने कृषी फीडर्स सौरऊर्जेवर चालविता येतील.

Success Story । शेतकऱ्याचे नशीबच चमकले! दुष्काळी भागात केली ड्रॅगन फ्रूटची लागवड; मिळाला ३० लाख रुपयांचा निव्वळ नफा

‘या’ उपकेंद्रांची निवड

जिल्ह्यातील आत्या, नळणी, रोहिलागड, कंडारी, केळीगव्हाण, मलखेडा, मंठा, पांगरी गोसावी, दानापूर. केदारखेडा, भोकरदन, डावरगाव, घनसावंगी, माहोरा, टेंभुर्णी, भोरगाव, डोणगाव, नेर, सेवली आणि डांबरी या उपकेंद्रांची निवड झाली आहे, अशी माहिती महावितरण कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. या प्रकल्पासाठी १३ ठिकाणच्या ३४४.५७ एकर जागेचे प्रस्ताव दिला आहे.

Agriculture News । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी सरकार सोडणार तुमच्या खात्यावर पैसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *