Havaman Andaj । ऐन थंडीच्या दिवसात महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांची खरीप पिकांची काढणी सुरू आहे, परंतु अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप प्रमाणात नुकसान झाले आहे.
Banana Export । बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा! नेदरलँडवासीय चाखणार केळीची चव, पहिला कंटेनर रवाना
हवामान खात्याकडून, राज्यात येत्या 24 तासांत पावसाची (Maharashtra Weather Update) शक्यता वर्तवली आहे. सध्या देशासह राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यासह देशात ढगाळ वातावरण तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. विविध भागात पाऊस (Heavy Rain Update) पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच राज्यात थंडीचा जोर वाढेल.
या भागात पडेल जोरदार पाऊस
कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आज अवकाळी पाऊस (Heavy Rain) पडेल. त्याशिवाय देशातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पश्चिम हिमालयीन भागामध्ये बर्फवृष्टी झाली आहे. देशातील अनेक भागात थंडीचा कडाका वाढला आहे. येत्या काही दिवसात थंडी आणखी वाढू शकते. दिल्लीतदेखील तापमानात घसरण्यास सुरूवात झाली आहे.
Agriculture News । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी सरकार सोडणार तुमच्या खात्यावर पैसे
कर्नाटकच्या किनारी भागात आज झालेल्या पावसामुळे तापमानात मोठी घसरण होऊ शकते. तसेच थंडी आणि धुक्याचा परिणाम आतापासून या भागात दिसून येणार आहे. आगामी पाच दिवस आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
Animal Fodder । शेतकऱ्यांना मिळत आहे कमी किमतीत जनावरांसाठी हिरवा चारा, जाणून घ्या ऑर्डर कशी करावी