Agriculture News । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) ही सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी चालवते. ज्या अंतर्गत शेतकरी बांधवांना वर्षभरात 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येतात. योजनेअंतर्गत आतापर्यंत 14 हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता शेतकरी 15 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. ज्याची तारीखही आता समोर आली आहे.
Havaman Andaj । आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ ठिकाणी अवकाळी बरसणार
15 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात 15 वा हप्ता हस्तांतरित करतील आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कालावधीत देशभरातील 8 कोटी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी तुम्ही https://pmevents.ncog.gov.in वर जाऊन नोंदणी करू शकता. याचे आयोजन कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून केले जाईल.
Banana Export । बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा! नेदरलँडवासीय चाखणार केळीची चव, पहिला कंटेनर रवाना
या शेतकऱ्यांना नाही मिळणार लाभ
ज्या शेतकऱ्यांनी eKYC पूर्ण केले आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळेल. तसेच फॉर्ममध्ये दिलेले सर्व तपशील बरोबर असावेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्जात दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा. पत्रात नाव, वडिलांचे नाव, पत्ता, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादी तपशील चुकीचे असल्यास, तुम्ही योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता.