Crop Insurance Scheme । केंद्र आणि राज्य सरकार सतत नवनवीन योजना (Government Scheme) सुरु करत असते. त्यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pradhan Mantri Crop Insurance Scheme) होय. लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. गारपीट, चक्रीवादळ, अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेचा (Crop Insurance) मुख्य आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना
अशातच आता या योजनेबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीक विमा योजनेच्या (PM Crop Insurance Scheme) अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात येणार आहे. राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमधील अडचणी दूर करणे, ही योजना जास्त प्रभावी पद्धतीने राबवणे किंवा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी मुंडे यांनी एक बैठक घेतली होती.
धनंजय मुंडे यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना
बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांनी आधार लिंक किंवा इतर कारणांमुळे पिकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयांच्या बाहेर लावण्याची सूचना केल्या. तसेच चालूवर्षी शासनाने पीक विम्यासाठी भरघोस तरतूद करण्यात आली असून सन २०१६ नंतर सर्वात जास्त पीक विम्याचा लाभ चालू वर्षी शेतकऱ्यांना मिळवून दिला, अशीही माहिती मुंडे यांनी दिली.
Delhi Farmers Protest । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो’ आंदोलनाला पाठिंबा
याबाबत लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे पिकविम्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करण्यासाठी किंवा काही राज्यांनी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या इतर पर्यायांचा विचार केला आहे. त्याची कार्यपद्धती, योजना आणि अंमलबजावणीचा अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी समिती गठित करण्यात यावी, असे आदेश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
Unseasonal Rain । शेतकऱ्यांना मोठा फटका! अवकाळी पावसामुळे ३८ हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान
या समितीची कार्यकक्षा आणि रचना याबाबत वेगळ्या सूचना निर्गमित करण्याचे निर्देश यावेळी धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. सदर समिती एक महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करणार असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.