Delhi Farmers Protest

Delhi Farmers Protest । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो’ आंदोलनाला पाठिंबा

बातम्या

Delhi Farmers Protest । तीन कृषी कायदे (Agricultural Laws) रद्द करताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याने पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन (Farmers Protest) मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने 12 मार्चपर्यंत राजधानी दिल्लीत कलम 144 (Section 144) लागू केले आहे.

Unseasonal Rain । शेतकऱ्यांना मोठा फटका! अवकाळी पावसामुळे ३८ हजार हेक्‍टरवरील शेतीचे नुकसान

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा

अशातच आता शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिला आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या (अराजकीय) नेतृत्त्वात पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी सर्व पिकांसाठी हमीभावाचा कायदा (Guarantee Act) करण्याची प्रमुख मागणी केली असून यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागणीचा अप्रत्यक्षरित्या समावेश होतोय. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहे.

Success Story । शेतकऱ्याची बातच न्यारी! विषमुक्त स्ट्रॉबेरी शेती पॅटर्न, कमी खर्चात मिळतंय जास्त उत्पन्न

पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा आहे. लवकरच महाराष्ट्रातील शेतकरीही आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला जातील, असे राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे (Bharat Dighole) यांनी माहिती दिली आहे.

Land Acquisition Act । काय आहे भूसंपादन कायदा? शेतकऱ्यांना त्याचा कसा होतो फायदा? जाणून घ्या

हमीभाव कायदा

शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देणारा कायदा केला जावा आणि इतर मागणीसाठी शेतकरी आजपासून नवी दिल्लीत आंदोलन करणार आहेत. दरम्यान मागील काही दिवसांपासून देशातील सर्व भागातील शेतकऱ्यांकडून हा हमीभाव कायदा करण्याची मागणी केली जातेय. पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांमधील अनेक जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यासह इंटरनेट सेवा बंद केली आहे.

Agriculture News । मोठी बातमी! देशातील 199 आणि राज्यातील 11 कृषी हवामान केंद्र बंद होणार

याच पार्श्वभूमीवर सरकारकडून शेतकरी संघटनांसोबत आंदोलन स्थगित करण्यासाठी चर्चा सुरु आहे. केंद्राचे तीन कॅबिनेट मंत्री शेतकऱ्यांची मन वळवण्याचे प्रयत्न करत आहेत. काहीही झाले तरी आंदोलन होणारच,असा पवित्रा शेतकरी संघटनांकडून घेण्यात आला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Farmers Protest । काय आहे हमीभाव कायदा? ज्यासाठी केले जातेय आंदोलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *