Ajit Pawar

Ajit Pawar । ‘कांदा, सोयाबीन, कापसाच्या दरावरून आम्हाला राजकारण करायचं नाही’; अजित पवार स्पष्टच बोलले

बातम्या

Ajit Pawar । देशातील शेतकरी यंदा चांगलाच हवालदिल झाला आहे. कारण यावर्षी शेतमालाचे दर (Agricultural rates) कमालीचे घसरले आहेत. शेतमालाला दर मिळत नसल्याने शेतकरी निराश झाले आहेत. योग्य तो दर मिळण्यासाठी शेतकरी ठिकठिकाणी आंदोलन (Farmer strike) करताना दिसत आहेत. अशातच आता शेतमालाच्या दरावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे.

Ethanol Production । मका उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! इथेनॉल निर्मितीसाठी होणार मकेची खरेदी, जाणून घ्या दर

हमीभावावरून शेतकरी संतप्त

सध्या कापूस आणि सोयाबीन (Cotton and soybean rate) पिकातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. हरियाणा-पंजाबच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. येथे आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कांदा निर्यातबंदी उठवण्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच पेटले आहे. सत्ताधारी पक्षांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.

Havaman Andaj । ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीटीची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण

“विरोधक गैरसमज निर्माण करून घेत आहेत. एनडीडीबीनं महानंद चालवण्यासाठी पुढाकार घेतला असून अजूनही हस्तांतरण झालेलं नाही. त्याची फक्त चर्चा सुरू आहे. काही संचालकांनी स्वइच्छेनं राजीनामे दिले आहेत. त्यांच्यावर कोणाचीही दमदाटी नाही. तसेच कांदा, सोयाबीन, कापसावरून आम्हाला राजकारण करायचं नाही. केंद्र सरकारनं काही हजार टन कांदा निर्यातीला (Onion export) परवानगी दिली आहे,” असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

Success Story । परभणीच्या शेतकऱ्याची कमाल! शेतात पिकवला चक्क 2 लाख 40 हजार रुपये किलो दराने विकला जाणारा आंबा

पुढे अजित पवार म्हणाले की, “कापूस आणि सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली असल्याने सीसीआयला (CCI) कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोयाबीनचीही खरेदी करण्याचे आदेश दिले असून हमीभावाच्या वर कापूस सोयाबीनचे दर राहतील, असा निर्णय घेतला आहे,” असेही अजित पवार म्हणाले आहेत.

Silk Farmer । सर्वात जास्त उत्पादन घेणाऱ्या रेशीम उत्पादक शेतकऱ्याला मिळणार सरकारकडून पुरस्कार, असा करा अर्ज

“महानंदचा कारभार आता गुजरातमधून चालू शकतो. कारण राज्यातील सर्व उद्योग गुजरातकडे वळविले जात आहे. महानंदचे अध्यक्ष कोण होते? राधाकृष्ण विखे पाटील यांचे सख्खे मेहुणे. ‘महानंद’ ची ५० एकर जागा उद्योगपती अदानींना विकण्याचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डाव आहे,” असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

Samriddhi Yojana । आनंदाची बातमी! महिला समृद्धी योजनेतून मिळणार बचत गटांसाठी चार टक्के दराने व्याज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *