Success Story

Success Story । परभणीच्या शेतकऱ्याची कमाल! शेतात पिकवला चक्क 2 लाख 40 हजार रुपये किलो दराने विकला जाणारा आंबा

यशोगाथा

Success Story । भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीशी आधारित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे. हल्ली शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करताना दिसतात. यामुळे तो शेतकरी चर्चेचा विषय ठरतो पण त्याने पिकवलेल्या शेतमालाला चांगला हमीभाव देखील मिळतो.

Silk Farmer । सर्वात जास्त उत्पादन घेणाऱ्या रेशीम उत्पादक शेतकऱ्याला मिळणार सरकारकडून पुरस्कार, असा करा अर्ज

शेतकरी असे काही पिके घेतात ज्यांची किंमत लाखांच्या घरात असते. सध्या एका अशाच आंब्याची (Mango) चर्चा होत आहे, ज्याची किंमत लाखांच्या घरात आहे. किंमत जाणून तुम्हालाही आश्चर्यचा धक्का बसला असेल. (Most expensive mango) या शेतकऱ्याने कोकणच्या हापूस आंब्याला देखील मागे टाकेल अशा महागड्या आंब्याची शेती यशस्वी करून दाखवली आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Expensive mango)

Samriddhi Yojana । आनंदाची बातमी! महिला समृद्धी योजनेतून मिळणार बचत गटांसाठी चार टक्के दराने व्याज

सर्वात महागडा आंबा

या आंब्याचे किंमत २ लाख 40 हजार रुपये प्रति किलो इतकी आहे. परभणी येथील वसंतराव नाईक कृषि विद्यापीठामध्ये पहिल्यांदा पश्चिम विभागीय कृषी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे आकर्षण आंबा ठरला आहे. परभणी जिल्ह्यातील वरुड येथील चंद्रकांत देशमुख (Chandrakant Deshmukh) या शेतकऱ्याने हा आंबा पिकवला आहे.

Amul Dairy । 36 लाख शेतकऱ्यांशी नाळ जोडलेल्या अमूल डेअरीची 50 वर्ष पूर्ण, जाणून घ्या सविस्तर

आंब्याचे 79 वाण

या शेतकऱ्याने आनंदीता फार्मस मधून त्यांनी राज्य आणि विदेशातील जवळजवळ 79 आंब्याच्या वानांची लागवड करून यशस्वीपणे उत्तम पद्धतीने उत्पादन घेतले आहे. यापैकी त्यांनी एकूण बारा वाण या प्रदर्शनामध्ये ठेवले. विशेष बाब म्हणजे यापैकी तीन वाण त्यांनी स्वतः संशोधित केले आहेत. या आंब्याची किंमत 3000 रुपयांपासून दोन लाख 40 हजार रुपये प्रति किलो आहे.

Crop Damage । मोठी बातमी! ‘या’ शेतकऱ्यांसाठी सरकारकडून 107 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

जपानमध्ये पिकवला जाणारा मिया झाकी आंब्याला त्या ठिकाणी दोन लाख 40 हजार रुपये दर मिळत आहे. या सर्व आंब्यांमध्ये कोय नाही. पुढील वर्षी चंद्रकांत देशमुख या सर्व आंब्याचे रोपे इतर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहेत. देशमुख यांच्या शेतामध्ये हापूस आंब्यापेक्षा जास्त नफा मिळवून देणारे आंब्याचे वाण आहेत.

Animals Subsidy Scheme । आता बिनधास्त पाळा घोडे, गाढव; सरकार देतंय 50 लाखांपर्यंतचं अनुदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *