Success story । इंदापूर : भारतात वेगवेगळ्या पिकांचे उत्पन्न घेतले जाते. त्यातील काही पिके शेतकऱ्यांना प्रचंड नफा मिळवून देतात. परंतु, प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना शेतीतून चांगले उत्पन्न मिळते असे नाही. काही पिकांना चांगला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. जर शेतीमध्ये योग्य नियोजन केले तर भरघोस उत्पन्न घेता येते. युवा शेतकरी यशस्वी प्रयोग (Farmer Success Story) करून दाखवत आहेत.
इंदापूरच्या युवा शेतकऱ्याने शेतीत २० गुंठे जमिनीवर लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले (Indapur Farmer News) आहे. अविनाश कळंत्रे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. इंदापूर तालुक्यातील तावशी येथील तो रहिवासी (Indapur news) आहे. त्यांनी आधुनिक पद्धतीने आपल्या दहा गुंठे जमिनीवर अजित १११ या वाणाच्या वांग्याची लागवड (Bringal cultivation) केली. त्यांना इस्राइल पद्धतीनं वांग्याची पीक घ्यायचं होत परंतू नियोजन चुकल्याने वांग्याचे पीक १० ते १२ फुटापर्यंत वाढत गेले.
Havaman Andaj । मान्सून परतीच्या प्रवासाला लागला? पाहा पुढील 48 तासांसाठीचा हवामान अंदाज
खर्च आणि उत्पन्न
विशेष म्हणजे मागील दहा महिन्यांपासून त्यांचे वांग्याचे उत्पादन सुरु आहे. आतापर्यंत त्यांना जवळपास पाच ते सहा लाख रुपयांचा लाभ झाला आहे. त्यांना आणखी एक ते सव्वा लाख रुपयांपर्यंतचे उत्पादन अपेक्षित आहे. एक ते सव्वा लाखांपर्यंत त्यांना यात खर्च झाला आहे. कळंत्रे यांनी वांग्याच्या दोन बेडमधील अंतर आठ फूट आणि दोन झाडातील अंतर अडीच फुटांचे ठेवले आहे. (Indapur Farmer Success Story)
Rose Farming । गुलाब लागवडीचा योग्य काळ कोणता? कोणत्या सुधारित वाणांची निवड करावी? जाणून घ्या माहिती
यापूर्वी घेतले उसाचे पीक
भारतात मोठ्या प्रमाणावर उसाचे उत्पन्न घेतले जाते. कळंत्रे यांनीदेखील यापूर्वी ऊसाची लागवड केली होती. पंरतू त्यातून त्यांना जास्त उत्पादन घेता आले नाही. त्यामुळे त्यांनी वांग्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला. वांग्याच्या पिकातून आज ते लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत.