Success story । शेतीचा भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. शेतीत शेतकरी वेगवेगळे प्रयोग घेत आहेत. ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे देशात स्टार्टअप सुरु करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. स्टार्टअपच्या बाबतीत देशात जगात तिसरा क्रमांक लागतो. असाच एक स्टार्टअप शेतकऱ्याच्या मुलाने सुरु केला आहे. ज्यामुळे त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
Jivamrit preparation । शेतकरी बांधवांनो! घरबसल्या २ मिनिटात तयार करा जीवामृत, जाणून घ्या पद्धत
ललित केशरे (Lalit Keshare) असे या मुलाचे नाव आहे. तो मध्य प्रदेशातील एका खेड्यातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. या मुलाने Groww नावाचं हे स्टार्टअप (Groww) सुरु केलं आहे. महत्त्वाचे म्हणजे या ब्रोकिंग फर्मने Zerodha ला मागे टाकले आहे. 2016 मध्ये मुलगा ललित केशरे याने त्याचे तीन कार्यकारी सहकारी हर्ष जैन, इशान बन्सल आणि नीरज सिंह सोबत फ्लिपकार्टमधील गलेगठ्ठ पगार असणारी नोकरी सोडली.
सर्वोच्च ब्रोकरेज कंपनी
त्यानंतर त्याने Groww स्टार्टअप सुरू केले. स्टार्टअपच्या सक्रिय गुंतवणूकदारांची संख्या खूप जास्त झाली आहे. ही देशातील सर्वोच्च ब्रोकरेज कंपनी ठरली असून 2022-2023 आर्थिक वर्षाच्या शेवटी, स्टार्टअपच्या ग्राहकांची संख्या 53.7 लाख होती. NSE डेटानुसार, 2023-24 आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटी, ही संख्या 66.3 लाख वापरकर्त्यांपर्यंत गेली आहे.
Gold Fish Farming । ‘सुवर्ण’ कमाई करून देणारा व्यवसाय, कमी खर्चात घरबसल्या अशी करा सुरुवात
सेवा
ग्रो हे स्टॉक, म्युच्युअल फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड, आयपीओ, यूएस स्टॉक्स, फ्युचर्स यांसारख्या सेवा प्रदान करते. मुदत ठेव आणि गुंतवणूकीसाठी एक उत्तम व्यासपीठ प्रदान करते. महत्त्वाचे म्हणजे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, सेक्वोया कॅपिटल आणि टायगर ग्लोबल सारख्या दिग्गजांनी या कंपनीत गुंतवणूक केली आहे.
Havaman Andaj । तापमानात घट झाल्याने थंडीची चाहूल, ‘या’ ठिकाणी कोसळणार जोरदार पाऊस