Banana Farming । हल्ली शेतकऱ्यांचा आधुनिक पिकांकडे जास्त कल वाढत चालला आहे. यामधून शेतकऱ्यांना जास्त फायदा होत आहे. परंतु, कोणत्याही पिकाची लागवड करायची असल्यास गरजेचे असते ते म्हणजे कष्ट. कष्टाशिवाय उत्पन्न मिळत नाही. प्रत्येक तालुक्यातील, जिल्ह्यातील शेतकरी वेगवेगळ्या पिकांची लागवड करतात. यात फळबागांचे (Banana Farming Infomartion) जास्त उत्पादन घेतले जाते.
सोलापूरमध्ये डाळिंबाचे जास्त उत्पादन घेतले जाते. म्हणून या जिल्ह्याची डाळिंबाचा (Pomegranate) जिल्हा अशी ओळख आहे. परंतु जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एका शेतकऱ्याने आगळावेगळा प्रयोग केला आहे. या शेतकऱ्याने केळीची लागवड (Banana Cultivation) करून चक्क 81 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. त्याच्या घवघवीत यशाने संपूर्ण तालुक्यात त्याची चर्चा होत आहे. कस केलं नियोजन? (Banana Cultivation Information) जाणून घेऊयात.
Bee Attack । धक्कादायक! मधमाशांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू तर दाेन जण जखमी
अशाप्रकारे केले नियोजन?
प्रताप लेंडवे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते पूर्वी डाळिंबाची शेती (Pomegranate Crop) करत होते. परंतु, सतत डाळिंबाला विविध रोगांचा सामना करावा लागत होता. खर्च जास्त असल्याने काहीच उत्पन्न हाती लागत नव्हते. त्यामुळे ते निराश झाले होते. मित्राच्या सल्ल्यानुसार त्यांनी केळीची लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि एकूण सहा एकरात केळीची लागवड केली. यासाठी प्रतिरोप 125 रुपये खर्च आला.
Price of flour and pulse । सर्वसामान्यांना सहन करावी लागणार महागाईची झळ! पीठ आणि डाळी महागणार
किती मिळाला दर?
त्यांना एका एकरमध्ये 50 टन केळीचे उत्पादन मिळाले. या हिशोबाचा विचार करता तीनशे टन सहा एकरमध्ये केळीचे उत्पादन मिळाले. त्यांनी या केळीची विक्री जम्मू-काश्मीरमधील व्यापाऱ्यांना केली. केळीला 35 रुपये किलो दर (Banana Price) मिळाला. अशाप्रकारे सहा एकर मधून त्यांना 90 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. केळीसाठी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्थापन केले होते.
जोखीम पत्करून मिळाले यश
प्रताप लेंडवे यांनी पिकवलेल्या केळीच्या घडाचे वजन 55 ते 60 किलो आहे. खर्च जाऊन केळीच्या पिकातून त्यांना नऊ महिन्यांत 81 लाख रुपयांची कमाई करता आली आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाने सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी डाळिंबाला जीआय टॅग मिळाला त्या ठिकाणी दुसरे पीक घेणे म्हणजे एक प्रकारची जोखीमच होय. तीही जोखीम पत्करून त्यांनी भरघोस यश मिळवले आहे.