Sugarcane Variety । भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे. भारतात आजही मोठ्या प्रमाणात उसाची लागवड (Cultivation of sugarcane) केली जाते. या पिकात उत्पन्न जास्त मिळते, शिवाय खर्चही कमी होतो. परंतु, उसाची लागवड केल्यास जास्त कष्ट करावे लागते. तरच उसाची शेती (Sugarcane farming) फायदेशीर ठरते. तसेच जास्त नफा मिळवून देणाऱ्या उसाच्या जातीचीही लागवड (Cultivation of sugarcane varieties) करावी लागते.
सध्या उसाच्या अनेक जाती आहेत. यातील काही सुरू, पूर्व हंगामी आणि आडसाली हंगामात लागवडीसाठी (Sugarcane Variety Information) खूप फायद्याच्या आहेत. अनेक शेतकरी को 86032 या उसाच्या जातीची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. समजा तुम्ही फुले ऊस 15012 या मध्यम पक्व गटातील आणि जास्त उत्पादन देणाऱ्या जातीचा विचार केल्यास ही जात फुले 265 या अधिक ऊस उत्पादन देणाऱ्या आणि को 94008 या साखरेचा (Sugar) जास्त उताराच येणाऱ्या जातीच्या संकरातून विकसित करण्यात आली आहे.
Bee Attack । धक्कादायक! मधमाशांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू तर दाेन जण जखमी
फुले ऊस 15012 आणि को 86032 या जातींच्या तुलनात्मक अभ्यास करायचा झाला तर को 86032 या जातीपेक्षा उत्पादन 16% आणि साखरेचे उत्पादन 15.51% जास्त मिळते. या जातीच्या ऊसातील व्यापारी शर्कराचे प्रमाण हे को 86032 पेक्षा 0.40 युनिट जास्त राहते. फुले 265 पेक्षा 0.80 युनिटने जास्त असून साखर कारखान्यांना जास्त साखर उतारा देणारी आणि फुले 265 या उसाच्या जाती इतके उत्पादन देणारी ही जात आहे.
जाणून घ्या फुले ऊस 15012 जातीची वैशिष्ट्ये
- ऊस जाड असून कांड्या सरळ असतात. कांड्यावर मेणाचा थर असतो.
- सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली हंगामासाठी शिफारस.
- पाण्याचा ताण सहन करणारी आणि न लोळणारी जात आहे.
- पाने मध्यम रुंद आणि सरळ असतात, त्यामुळे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याचा ताण सहन करते.
- खोडवा उत्तम असतो.
- चाबूक काणी रोगास प्रतिकारक, लालकुज आणि काणी रोगास मध्यम प्रतिकारक असतो.
तसेच खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड आणि खवले किडीस कमी प्रमाणात बळी पडते. - या पानावर किंवा पानाच्या टोपणावर कूस नसते.
- तुरा अल्प प्रमाणात आणि उशिरा येत असल्याने जास्त पाऊस काळ असल्यास किंवा जास्त पावसाच्या प्रदेशात कमी तुरा आल्यामुळे इतर जातींपेक्षा उत्पादनात वाढ जास्त होते.
Tur Market । शेतकऱ्यांना तुरीमुळे अच्छे दिन! नवीन तुरीला मिळणार ‘इतका’ भाव