Tur Market

Tur Market । शेतकऱ्यांना तुरीमुळे अच्छे दिन! नवीन तुरीला मिळणार ‘इतका’ भाव

बाजारभाव

Tur Market । शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी सहन करावा लागतो. यामुळे त्यांचे खूप नुकसान होते. यावर्षी राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा (Heavy Rain) चांगलाच फटका सहन करावा लागत आहे. यामध्ये अनेक पिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने (Heavy Rain in Maharashtra) यंदा तुरीचे खूप नुकसान झाले आहे. याचा परिणाम तुरीवर (Tur Crop) झाला आहे.

Cultivation of silk । रेशीम लागवडीसाठी मिळतंय पावणे दोन लाखांचं अनुदान, जाणून घ्या योजना

तुरीचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. असे असल्याने तुरीला चांगला भाव (Tur Price) मिळू शकतो. अशातच देशात तुरीची लागवड मागील वर्षीच्या तुलनेत खूप कमी आहे. कारण यंदा दुष्काळी स्थितीचा फटका तुरीला झाला आहे. तूर आवकेच्या हंगामात यंदा सरासरी ८ हजारांच्या दरम्यान दर (Tur Rate) राहू शकतात. आवक कमी झाल्यानंतर दरात (Tur Price Hike) पुन्हा सुधारणा होईल, असा अंदाज अभ्यासकांनी केला आहे.

Success story । गलेगठ्ठ पगारावर पट्ठ्याने मारली लाथ! वाटाणा शेती करून कमावले 5 कोटी; जाणून घ्या कस केलं नियोजन?

तुरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान

आता पावसाने तुरीला चांगलाच फटका दिला आहे. त्यामुळे उत्पादनातील घट जास्त राहील. रविवारपासून मराठवाडा आणि विदर्भ या महत्वाच्या तूर उत्पादक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावासाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या पावसाने इतर पिकांसह तुरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तूर पीक फुलं आणि शेंगा भरण्यासाच्या स्थितीत निर्माण झाल्याने नुकसानीची पातळी खूप जास्त आहे.

Agri startups । तरुणाचा नादच खुळा! 3 वर्षे शेतीत काबाडकष्ट केले अन् आता उभारली 1200 कोटींची कंपनी

दरम्यान, नवीन तूर महिनाभरानंतर बाजारात दाखल होईल. जानेवारी महिन्यानंतर बाजारातील आवक वाढू शकते. सध्या बाजारात तुरीला सरासरी १० हजारांचा दर मिळत आहे. देशातील उत्पादन, आयात आणि मागणीची स्थिती लक्षात घेता आवकेच्या हंगामातही तुरीला किमान ८ हजारांचा भाव मिळेल. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर बाजारभावात सुधारणा होईल. अभ्यासकांच्या मतानुसार, आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दर १० हजारांचा टप्पा पार करू शकते.

Dairy Farming । शेतकऱ्याची अशीही कृतज्ञता, म्हशीच्या मृत्यूनंतर दिल अख्ख्या गावाला जेवण

मिळणार जास्त भाव

आफ्रिका आणि इतर देशांमधून तूर आयात होऊ शकते. पण तुरीचा पुरवठा आणि मागणीमध्ये मोठी तफावत पाहायला मिळेल. आतही तफावत जास्त असल्याने तूर १० हजारांना विकत आहे. पुढील हंगामातदेखील हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. असे असल्याने तुरीला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहे.

Agriculture Drone । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेती करण्यासाठी मिळणार ‘ऍग्री ड्रोन’; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *