Agriculture Drone

Agriculture Drone । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेती करण्यासाठी मिळणार ‘ऍग्री ड्रोन’; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

बातम्या

Agriculture Drone । शेतीत आता नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत. शेतीसाठी फायदेशीर असणाऱ्या मशीन बाजारात दाखल होऊ लागल्या आहेत. या यंत्रांच्या मदतीने कामे कमी वेळेत आणि कमी खर्चात होऊ लागली आहेत. सरकार देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. सरकार वेळोवेळी यंत्रांसाठी अनुदान उपलब्ध करून देते. अशातच आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

Success Story । इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्याचं पुढचं पाऊल! ‘या’ पिकाच्या लागवडीतून केली लाखोंची कमाई

भाडे तत्त्वावर मिळणार ड्रोन

केंद्र सरकार आता शेतकऱ्यांना ऍग्री ड्रोन (Drone) देणार आहे. नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील 4 वर्षांत देशातील 15 हजार महिला बचत गटांच्या माध्यमातून गावागावांमध्ये ड्रोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकार 1 हजार 261 कोटी रुपयांचा निधी देणार आहे. शेतकऱ्यांना भाडे तत्त्वावर हे ड्रोन (Agri Drone) मिळतील.

Havaman Andaj । शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! राज्यावर अवकाळीचे संकट, पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

दिले जाणार प्रशिक्षण

महिला बचत गटांकडे ड्रोन 2023-24 आणि 2025-26 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येतील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी काही शुल्क आकारण्यात येणार आहे. महिला बचत गटाच्या महिलांना ड्रोन (Agriculture Drone Use In India) एकूण 10 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांना सरकारकडून हे प्रशिक्षण मिळेल. त्यानंतर या महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून ड्रोन उपलब्ध करून देतील.

Success Story । ही 23 वर्षांची मुलगी ओसाड जमिनीतून सोने उगवते, वाचा तरुणीची यशोगाथा

400 ड्रोनची पहिली ऑर्डर

याबाबत केंद्रीय सूचना आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “केंद्र सरकार एका ड्रोन खर्चाच्या 80 टक्के रक्कम आणि त्यासाठीच्या इतर उपकरणांसाठी एकत्रित प्रत्येकी 8 लाख रुपये रक्कम देणार आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु असून सरकार इफ्को सारख्या संस्थेच्या माध्यमातून ड्रोन उपलब्ध करून देणार आहे. यासाठी इफ्को या संस्थेला 400 ड्रोनची पहिली ऑर्डर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिली जाईल,” असे ठाकूर यांनी सांगितले.

Potato and rice prices । अवकाळी पावसाने पिकांची नासधूस, कांद्यापाठोपाठ बटाटे आणि तांदळाचे भाव वाढले

दरम्यान, सध्या शेतीत आधुनिकीकरनाला चालना देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहे. अशातच आता केंद्र सरकारकडृून ड्रोनच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात मोठा बदल घडवून आणण्याची तयारी दर्शवली जात आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होईल. औषध फवारणीसाठी लागणारा वेळ यामुळे वाचू शकतो.

Unseasonal Rain । अवकाळी पावसाने टोमॅटोचे पीक उद्ध्वस्त, शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *