Success Story

Success Story । इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्याचं पुढचं पाऊल! ‘या’ पिकाच्या लागवडीतून केली लाखोंची कमाई

यशोगाथा

Success Story । शेती पूर्वी ज्या पद्धतीने केली जायची त्या पद्धतीने आता शेती केली जात नाही. शिवाय पिके देखील वेगवेगळी जातात. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील कमालीची वाढ होत आहे. शेतकरी आता अलीकडे सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहेत. नवनवीन प्रयोगासाठी शेतकरी सोशल मीडिया तसेच युट्युबची मदत घेत आहे. इतकेच नाही तर ते यावरून चित्र-विचित्र जुगाड करत आहेत. ज्याचा त्यांना फायदा (Farmer Success Story) होत आहे.

Havaman Andaj । शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! राज्यावर अवकाळीचे संकट, पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

शेतकरी आता पारंपरिक पिके सोडून आधुनिक पद्धतींच्या पिकांचा प्रयोग करत आहेत. दुसऱ्या देशात पिकले जाणारे फळ आपल्या देशात पिकवले जात आहेत. असाच एक प्रयोग इंदापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने (Indapur Farmer Success Story) केला आहे. पांडुरंग बराळ असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते इंदापूर तालुक्यातील कचरवाडी गावात राहतात. त्यांनी चक्क ब्राझीलमधील फळाची यशस्वी शेती केली आहे.

Success Story । ही 23 वर्षांची मुलगी ओसाड जमिनीतून सोने उगवते, वाचा तरुणीची यशोगाथा

अशी मिळाली माहिती

पांडुरंग बराळ यांनी ब्राझिलियन फ्रुट असणाऱ्या पॅशन फ्रुटच्या (Passion fruit) लागवडीतून लाखो रुपयांची कमाई केली आहे. बराळ हे सुरुवातील शेतात डाळिंब, इतर भाजीपाला पिके, पपई आणि पेरू सारख्या फळबागांची लागवड करायचे. परंतु त्यांना कष्ट जास्त आणि उत्पादन कमी मिळत असल्याचे. या पिकांमधुन त्यांना अपेक्षित नफा मिळत नसल्याने त्यांनी युट्युबचा वापर करून नवनवीन पिकांची माहिती घेतली.

Potato and rice prices । अवकाळी पावसाने पिकांची नासधूस, कांद्यापाठोपाठ बटाटे आणि तांदळाचे भाव वाढले

पिकांबद्दल माहिती घेत असताना त्यांना राजस्थान राज्यातील किशनगड येथील एका शेतकऱ्याने पॅशन फ्रुटची लागवड केल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी त्याबद्दल थेट किशनगड गाठून माहिती घेतली. खते आणि औषधांची गरज कमी होण्यासाठी त्यांनी बियाण्यांच्या साह्याने पॅशन फ्रुटची रोपे घरच्या घरीच तयार करून एक एकर क्षेत्रात सात बाय दहा अंतरावर पॅशन फ्रुटची लागवड (Cultivation of passion fruit) केली.

Unseasonal Rain । अवकाळी पावसाने टोमॅटोचे पीक उद्ध्वस्त, शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

कमाई

लागवडीनंतर चार महिन्यांनी फळांची काढणी सुरू झाली. सध्या ते त्यांनी पिकवलेले पॅशन फ्रुट हे पुणे आणि मुंबईमध्ये विकले जाते. त्या ठिकाणी या फळाला 130 ते 150 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. त्यांनी आतापर्यंत पॅशन फ्रुटच्या लागवडीतून एका एकरमध्ये चार लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Success Story । सेवानिवृत्त शिक्षकाची कमाल! एकरी घेतले ९७ टन उत्पादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *