Success Story । हल्ली सोशल मीडियाचा वापर (Use of social media) झपाट्याने वाढला आहे. तरुणाई सोशल मीडियामध्ये गुरफटली आहे. याच सोशल मीडियाचा (Social media) वापर करून काहीजण बक्कळ पैसे कमावत आहेत. तर काही तरुण नोकरी सोडून व्यवसाय क्षेत्रात उतरले आहेत. परंतु, व्यवसाय (Business) करणे प्रत्येकाला जमते असे नाही. काहीजण व्यवसायाला भरारी मिळावी यासाठी देखील सोशल मीडियाचा वापर करतात.
Success Story । उच्च शिक्षित तरुणाची लै भारी कमाल, शिमला मिरचीतून मिळवला बक्कळ नफा
अशी केली सुरुवात
सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून मराठवाड्यातील चार तरूणांनी पुण्यात हुरडा विक्रीचा (Hurda selling in Pune) एक भन्नाट व्यवसाय चालू केला आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील अमित मरकड (Amit Markad) हा तरुण पुण्यात शहरात आला. पण त्याचा तिथे अपेक्षित जम बसत नव्हता. त्याला आपण शेतकरी असल्याची जाणीव झाली आणि त्याने हुरडा विक्रीचा निर्णय घेतला. (Youth of Marathwada selling hurda)
Subsidy for Well । मोठी बातमी! आता विहिरीसाठीही मिळेल अनुदान, ग्रामपंचायतीत द्यावा लागेल प्रस्ताव
सर्वात अगोदर अमित गावाकडून हुरडा बनवून आणून पुण्यात मित्र मंडळी किंवा ओळखीच्या लोकांना त्याची विक्री (Hurda selling business) करायचा. या व्यवसायात काही दिवसांनी त्याचा जम बसू लागला. इथपर्यंत न थांबता त्याने सोशल मीडियाच्या मदतीने जाहिरात करून हुरडा विक्री सुरु केली. ऋषिकेश नवले, श्रीकृष्ण थेटे आणि राहुल जाधव या मित्रांना त्याने सोबत घेतले कारण एकट्याला व्यवसाय करणे शक्य नव्हते.
Drought in Maharashtra । भीषण वास्तव! तब्बल ५४ लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही दुष्काळ, अवकाळीची मदत
सध्या तो पुण्यात होणाऱ्या फेस्टिवल, प्रदर्शनामध्ये स्टॉल लावून हुरडा विकत आहे. तसेच तो दररोज 50 किलोपेक्षा जास्त हुरडा ऑनलाईन पद्धतीने विकत आहे. ‘मराठवाडा हुरडा कंपनी’ असे त्याने आपल्या व्यवसायाला नाव दिले आहे. इतकेच नाही तर तो याच कंपनीच्या माध्यमातून केशर, हापूस आंब्याची विक्री देखील करत आहे. व्यवसायातील त्याचे चारही मित्र शेतकरी आहे.
Brinjal Rate । वांग्याने मोडले सर्व विक्रम! जाणून घ्या दर
किती होते कमाई?
त्यापैकी एक मित्र कोकणातील हापूस आंब्याचा देखील शेतकरी आहे. याच कारणामुळे त्यांनी हुरडा आणि हापूस अशी एकत्रित विक्री सुरु केली आहे. जर हुरडा खराब निघाला तर तो 10 वेळा बदलून देण्याची खात्री या तरुणांनी दिली आहे. त्यामुळे त्यांना याचा खूप फायदा होत आहे. हिवाळ्याच्या दिवसात हुरड्याला आणि उन्हाळ्यात आंब्याला जास्त मागणी असते. हुरड्यातुन त्यांना तीन महिन्यात सर्व खर्च जाऊन तीन लाखांचा नफा मिळतो. तर आंब्याचे वेगळे उत्पन्न मिळते.
Land rule । तुम्हालाही जमीन नाही का? तर मग ‘या’ ठिकाणी करा अर्ज, मिळेल जमीन