Success Story

Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! तीन एकर जमिनीवर केली नारळ शेती, मजुरांचीही लागत नाही गरज; जाणून घ्या कसं केलं नियोजन?

यशोगाथा

Success Story । अलीकडच्या काळात काही शेतकरी आधुनिक शेतीकडे वळू लागले आहेत. विशेष म्हणजे त्यांना यात चांगला नफा मिळत आहे. शेतीमध्ये खुप कष्ट आणि मेहनत घ्यावी लागते. तरच त्याचे चांगले फळ हाती येते. शेतीत मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागते. परंतु, अनेकदा मजूर उपलब्ध होत नाही. एका शेतकऱ्याने मजुरमुक्त शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.

Animal Care । ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा जनावरांच्या आजारापासून मुक्तता, जाणून घ्या सविस्तर

गणेश चौधरी असे या धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी तीन एकर क्षेत्रावर नारळाच्या झाडांची लागवड (Coconut farming) केली आहे. खरंतर बाजारात नारळांना चांगली मागणी आहे. दरम्यान, चौधरी यांनी मागील काही दिवसांपूर्वी आपल्या वाफा खाचा यंत्राची निर्मिती केली होती, अशातच आता त्यांनी नारळाच्या झाडांची लागवड (Farmer Success Story) केली आहे.

Ajit Pawar । टोमॅटो, कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी आक्रमक; अडवला अजित पवारांचा ताफा

या जातीच्या झाडाची केली लागवड

गणेश चौधरी यांनी कोलंबस आणि मलेशियन ग्रीन डार्क या जातीच्या नारळाच्या झाडांची लागवड केली असून त्यापैकी कोलंबस या नारळाच्या झाडाचे वय हे पन्नास वर्षे आहे. तर मलेशियन ग्रीन डार्क या नारळाचे वय साठ वर्षे आहे. त्यामुळे याचा फायदा गणेश चौधरी यांना होईल.

Agriculture News । पीक फवारणीसाठी ड्रोनचा वापर करायचाय? तर मग ही बातमी वाचाच

पंचक्रोशीतील शेतकरी देत आहेत भेट

पारंपारिक पिकांना पर्याय म्हणून बहुवार्षिक पिकांची लागवड करणे ही सध्याची गरज आहे, असे गणेश चौधरी यांनी सांगितले आहे. त्यांनी केलेल्या नारळाच्या शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी भेट देत आहेत. त्यांनी केलेला अनोखा प्रयोग सध्या धुळे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

Success Story । शेतकऱ्याची कमाल! अवघ्या दीड महिन्यात 40 गुंठे कोथिंबिरीतून घेतले तीन लाखांचे उत्पन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *