Success story । अनेकजण पारंपरिक शेती करतात. परंतु त्यातून मोजकेच पैसे हाती येतात. महत्त्वाचे म्हणजे त्याला दिवसरात्र मेहनत करावी लागते. प्रत्येक वर्षी या पिकांना चांगले उत्पन्न मिळतेच असे नाही. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना पिकांना बाजारभाव न मिळाल्याने पिके फेकून द्यावी लागतात. काही शेतकरी आधुनिक शेतीकडे वळू लागले आहेत. यात चांगला नफा मिळतो.
Agriculture News । शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! भाजीपाल्याला मिळतोय पन्नास टक्के जास्तीचा भाव
एका शेतकऱ्याने लिंबाच्या अवघ्या 10 झाडांपासून लाखो रुपयांचा नफा (Lemon farming) मिळवला आहे. रामसेवक प्रसाद असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते बिहारमधील गया येथील केसापी गावचे रहिवासी आहेत. त्यांनी 10 लिंबाच्या झाडांची लागवड केली असून त्यांना वर्षभरात चांगले उत्पन्न घेता येत आहे. रामसेवक प्रसाद यांना या झाडापासून वार्षिक तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. (Success story lemon farming)
Dhananjay Munde । आनंदाची बातमी! ‘या’ पिकाच्या लागवडीसाठी मिळणार हेक्टरी 7 लाखांचं अनुदान
या लिंबाच्या झाडांना संपूर्ण वर्षभर फळे येतात. ते कधीच झाडाचे लिंबू तोडत नाहीत, ज्यावेळी लिंबू झाडावरुन खाली पडते, त्यावेळी ते लिंबू विक्रीसाठी बाजारात नेतात. लागवडीनंतर चार वर्षांनी फळे आली. एका लिंबाच्या झाडापासून एका वर्षात 25 ते 30 हजार रुपये मिळत आहेत. लिंबाच्या झाडाची उंची 20 फुटांपेक्षा जास्त आहे.
Modern agriculture । इस्रायल शेती तंत्र जगभरात का लोकप्रिय आहे? कशी करतात येथे शेती? जाणून घ्या…
सेंद्रिय खतांचा वापर
विशेष म्हणजे जास्त उत्पन्न मिळत असल्याने रामसेवक प्रसाद यांनी त्यांच्या शेतात लिंबाची 50 झाडे लावली आहेत. ते कोणतेही रासायनिक खत न वापरता केवळ शेण खत वापरतात. त्यामुळे त्यांना कोणताही खर्च येत नाही. खरंतर बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर पारंपरिक पिके घेतली जातात. परंतु रामसेवक प्रसाद यांनी लिंबाची शेती करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
Sweet Potato Varieties । ‘या’ आहेत रताळ्याच्या सुधारित जाती, लागवड केल्यास मिळेल प्रचंड नफा