Success Story । ऊस (Sugarcane) हे जास्त नफा मिळवून देणारे पीक आहे. यामुळे राज्यातील अनेक शेतकरी उसाचे उत्पादन (Sugarcane production) घेतात. विविध तंत्रज्ञान आणि विविध पीक पद्धतीमुळे शेतकरी या पिकातून भरघोस कमाई करताना दिसत आहेत. उसाच्या देखील अनेक जाती (Sugarcane varieties) आहेत. काही जातीमुळे उसाचे चांगले उत्पादन मिळते. तंत्रज्ञानाची मदत घेत शेतकरी विविध प्रयोग करत आहेत.
Ethanol Subsidy । केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इथेनॉल निर्मितीसाठी मिळणार अनुदान
हल्ली शेतकरी गुंठा जमिनीत देखील भरघोस उत्पन्न घेत आहेत. काही शेतकरी एकरी 55 ते 80 टन उसाचे उत्पादन घेतात. पण काही शेतकरी गुंठ्यात जास्त उत्पादन घेतात. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील लाटवडे या गावचे शरद पाटील (Sharad Patil) यांनी गुंठ्यात बक्कळ कमाई केली आहे. त्यांनी खडकाळ माळरानाच्या जमिनीवर चांगले उत्पन्न घेतले आहे.
Labor Shortage । महिला मजुरांची मोठी टंचाई, कांदा लागवड रखडली
असे केले नियोजन
ते आयटीआय उत्तीर्ण असून त्यांचा टीव्ही रिपेरिंगचा व्यवसाय आहे. त्यांनी व्यवसायाला जोड मिळावी म्हणून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी खडकाळ माळरानाच्या जमिनीमध्ये उत्पादन काढण्याचे ठरवले. योग्य ते नियोजन करत त्यांनी 15 गुंठे जमीन ऊस लागवड करत कष्ट करण्यास सुरुवात केली. त्यांनी 15 गुंठे जमीन तयार करून त्या जमिनीत चार ट्रॉली शेणखत टाकले.
आडव्या नांगरट पद्धतीने त्यांनी ८६०३२ या जातीच्या उसाची दोन डोळे पद्धतीने लागवड केली. इतकेच नाही तर त्यांनी खरीप हंगामामध्ये लागवड केल्यामुळे आंतरपीक म्हणून कोकण पद्धतीने भुईमूग लागवड केली. उसाला ड्रीपची सोय करून पाट पाण्याची सोय केली. 15 गुंठामध्ये त्यांना सहा क्विंटल भुईमुगाच्या शेंगांचे उत्पादन घेतले.
Milk Subsidy । दूध अनुदानाची घोषणा हवेतच विरली, अजूनही जीआर नाही
मिळाले भरघोस उत्पन्न
ऊस पिकाचे व्यवस्थापन करत ऊस पिकाच्या पानांची रुंदी आणि उसाची पेरे जाड व्हावेत यासाठी दोन वेळा फवारणी तसेच आळवणी केली. उसाची लागवड करत असताना दहा फुट अंतरामध्ये 55 ते 60 उसाच्या रोपांची संख्या ठेवली. उसाचे वजन 45 टन 245 किलो इतके आले. त्यांच्या या यशाने समाजापुढे एक वेगळा आदर्श तयार झाला आहे.
Solar pump । शेतकऱ्यांनो, या सरकारी योजनेचा लाभ घेऊन मोफत वापरा वीज, जाणून घ्या योजना