Labor Shortage

Labor Shortage । महिला मजुरांची मोठी टंचाई, कांदा लागवड रखडली

बाजारभाव

Labor Shortage । कांदा लागवडीचा (Onion cultivation) हंगाम चालू असल्याने सर्वत्र मंजूर टंचाई जाणवत आहे. मागील काही वर्षापुर्वी शेतीमघ्ये गव्हू ,हरभरा ही पीके मोठ्या प्रमाणात घेतली जायची. अगदी मोजके शेतकरी उन्हाळी कांद्याची लागवड (Cultivation of spring onion) करीत असल्याने सहज मजूर उपलब्ध होत असत. आता मात्र मजुरांची टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे.

Sheep Died । शेतातून घरी जाताना घडला मोठा अनर्थ! अचानक 80 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान

महिला मजुरांची टंचाई

दरम्यान, बाजारात विविध कंपनीचे तणनाशक उपलब्ध झाल्याने कांद्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. आता गावातील पूर्वी मजुरी करणारे मजुर आता तेही बागायती शेती करु लागले आहेत. (Onion Cultivation Labor Shortage) त्यांच्याकडे रोजगार उपलब्ध झाल्याने तेही अगदी मोजक्या प्रमाणात येतात. सध्या रब्बी हंगामातील कांदा लागवड जोरात सुरू झाला आहे आणि महिला मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे.

Milk Subsidy । दूध अनुदानाची घोषणा हवेतच विरली, अजूनही जीआर नाही

खूप दूरवरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मजूर आणावे लागत आहेत. साहजिकच यासाठी जास्त खर्च होत आहे. खर्चाचा विचार केला तर वाहनासाठी दररोज अंतरानुसार एक हजार ते दीड हजार भाडे आणि एक महिलेला कांदा लागवडीसाठी प्रती दिन ३५० रुपये मजुरी द्यावे लागत आहे. साधारणपणे एका महिला मजुरासाठी सरासरी १०० रुपये वाहनखर्च येत आहे.

Solar pump । शेतकऱ्यांनो, या सरकारी योजनेचा लाभ घेऊन मोफत वापरा वीज, जाणून घ्या योजना

वाहतूक आणि मजूर खर्च जास्त

एक एकर क्षेत्रातील कांदा लागवडीचा विचार करायचा झाल्यास १४ ते १६ महिला मजूर लागतात, तसेच मल्चिंग पेपरचा वापर केला केल्यास एक एकर क्षेत्रातील कांदा लागवड करण्यासाठी २० ते २२ महिला मजुरांची गरज भासत आहे. लागवडीसाठी शेतकऱ्यांना जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत, शिवाय लागवडीला जास्त खर्च करून पुढे कांद्याला भाव (Onion Pirce) मिळेलच असे नाही.

Crop Damages Limit । अवकाळीने झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईबाबत शासनाचा मोठा निर्णय

सध्या सरकारने कांद्याची निर्यातबंदी (Onion export ban) करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याचे दर खूप कमी झाले आहेत. शेतकऱ्यांना कांदा विकून त्यातून खर्च देखील मिळत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात नाराजीचे वातावरण पसरले आहे. इतकेच नाही तर निर्णय मागे घेण्यासाठी शेतकरी ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत.

Vegetable rate । ट्रक चालकांच्या संपाचा मोठा परिणाम, भाज्यांचे दर एका रात्रीत झाले दुप्पट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *