Maize Rate

Maize Rate । मकाच्या दरात सर्वाधिक वाढ! जाणून घ्या बाजारात किती मिळतोय दर?

बाजारभाव

Maize Rate । मका (Maize) हे देखील पीक शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळवून देते. त्यामुळे दरवर्षी या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. कमी वेळेत आणि कमी खर्चात हे पीक भरघोस उत्पन्न (Maize production) मिळवून देत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होतो. खरीप आणि रब्बी हंगामात मका या पिकाची लागवड (Maize Cultivation) करण्यात येते.

Industrial Electricity । मोठी बातमी! आता औद्योगिक वीज जोडणीच्या खर्चाचा भार उचलणार महावितरण

यंदाही मकाचे दर वाढले आहेत. देशातंर्गत बाजारात मकाची मागणी वाढली आहे, त्यामुळे मका दरात कमालीची वाढ (Maize Rate Hike) झाली आहे. मागील ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत देशभरातील बाजार समित्यांमध्ये मकाचे दर जवळपास 20 टक्क्यांनी वाढले आहेत. ऑक्टोबर महिन्यात मकाला 1,850 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत होता.

Grape rates । धक्कदायक! करपा रोगाचा प्रादुर्भावामुळे द्राक्ष उत्पादकांचे तब्बल ३०० कोटींचे नुकसान

का वाढले दर?

पण आता त्या तुलनेत मकाचे दर हे कमाल 2,300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेले आहेत. अशातच आता येत्या काळात मका दर वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सध्या उसापासून इथेनॉल निर्मितीवर केंद्र सरकारकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे इथेनॉल निर्मिती उद्योगाचा कल मकापासून इथेनॉल निर्मितीकडे वाढला आहे.

Tractor Subsidy Scheme । ट्रॅक्टरसाठी मिळतंय 50 टक्के अनुदान? जाणून घ्या यामागचं सत्य, नाहीतर होईल फसवणूक

इतकेच नाही तर देशातील पोल्ट्री उद्योगासाठीच्या खाद्यासाठी मकाला मोठी मागणी वाढली असून देशातंर्गत बाजारात मकाचा वापर वाढला आहे. याच कारणांमूळे दरात देखील वाढ झाली आहे. सरकारने मका या पिकाला 2023-24 या वर्षासाठी 2,090 रुपये प्रति क्विंटल हमीभाव ठरवला आहे. देशासह महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमध्ये दरात वाढ झाली आहे.

Advance Crop Insurance । ब्रेकिंग न्यूज! ‘या’ जिल्ह्यात २१४ कोटी ६२ लाख रुपयांचा अग्रिम विमा वाटप

किती मिळतोय दर?

दरम्यान, सध्या राज्यातील अनके बाजार समित्यांमध्ये मकाला कमाल 2200 ते 2300 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून खरिपातील मकाचा हंगाम संपला आहे. शिवाय रब्बी हंगामातही मकाचा पेरा हा पाण्याअभावी अपेक्षित झाला नाही. खरिपाचे मका उत्पादन यंदा मागील वर्षीच्या तुलनेत कमी राहिले आहे. परिणामी, मकाचा तुटवडा भासू शकतो.

Intercropping in Sugarcane । ऊसामध्ये आंतरपीक घेणे फायद्याचे की तोट्याचे? वाचा महत्वाची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *