Advance Crop Insurance । ब्रेकिंग न्यूज! ‘या’ जिल्ह्यात २१४ कोटी ६२ लाख रुपयांचा अग्रिम विमा वाटप

बातम्या

Advance Crop Insurance । शेतकरीवर्गाला अनेक समस्यांचा सामना करत शेती करावी लागते. यात त्यांना दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागतो. तर कधीकधी शेतमालाला हमीभाव नसतो. या समस्यांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर खूप मोठा परिणाम होत असतो. यंदाही शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

Intercropping in Sugarcane । ऊसामध्ये आंतरपीक घेणे फायद्याचे की तोट्याचे? वाचा महत्वाची माहिती

यंदा अवकाळी पावसामुळे (Heavy rain) पिकांचे खूप नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी सरकारकडे मदतीची ( Crop Insurance) विनंती करत होते. दरम्यान, नांदेड (Nanded) जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या २५ टक्के अग्रिम रक्कम मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनास अधिसूचना काढण्याबाबत सूचना सरकारकडून दिल्या होत्या.

Goat rearing । दूध दर झाले कमी, पशुपालकांचा वाढला शेळीपालनाकडे कल

२१४ कोटी ६२ लाख रुपयांचा अग्रिम विमा

सूचनेनुसार आता नांदेड जिल्ह्यात २८५ कोटींचा अग्रिम विमा मंजूर झाला असून यापैकी आता पर्यंत २१४ कोटी ६२ लाखांपेक्षा जास्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. तसेच उरलेली रक्कम देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती विमा कंपनीकडून देण्यात आली आहे.

Tree Plantation Scheme । धक्कादायक! अनुदान अपहारप्रकरणी न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

दरम्यान, पंधरा दिवसापूर्वी अग्रिम पीकविमा वाटपाचे काम सुरु केले आहे. पण या कामात गती नाही, त्यामुळे सध्या अनेक शेतकऱ्यांना याबाबत प्रतिक्षा करावी लागत आहे. यात नांदेड जिल्ह्याचा देखील समावेश आहे. त्यामुळे आतातरी नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Guar rate । मोठी बातमी! गवारीच्या दरात सर्वाधिक वाढ; पाहा किती मिळतोय दर?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *