Goat rearing

Goat rearing । दूध दर झाले कमी, पशुपालकांचा वाढला शेळीपालनाकडे कल

शासकीय योजना

Goat rearing । अनेक शेतकरी शेतीतुन जास्त उत्पन्न मिळत नसल्याने पशुपालनाचा व्यवसाय करतात. दूध व्यवसायातून शेतकरी चांगला नफा मिळवत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून दुधाचे दर खूप कमी झाले आहेत. पशुखाद्याच्या किमती खूप वाढल्या आहेत. त्यामुळे पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) खूप संकटात आला आहे. त्यामुळे पशुपालक आर्थिक संकटात आले आहेत.

Tree Plantation Scheme । धक्कादायक! अनुदान अपहारप्रकरणी न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

शेळीपालनाचा व्यवसाय

अशातच आता शेतकरी पशुपालन सोडून शेळीपालनाकडे वळू लागले आहेत. शेळीपालनामध्ये कमी जागा लागते. या व्यवसायात खर्च देखील खूप कमी येतो. असे असल्याने अनेकजण हा व्यवसाय (Goat rearing business) करत आहेत. गरिबांची गाय म्हणून शेळीकडे पाहिलं जाते. शेळीला जनावरांच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात चारा लागतो. त्यामुळे हा व्यवसाय खूप परवडतो. (Goat rearing information)

Guar rate । मोठी बातमी! गवारीच्या दरात सर्वाधिक वाढ; पाहा किती मिळतोय दर?

पशुपालनाचा व्यवसाय परवडत नसल्याने अनेक शेतकरी आता शेळीपालनाचा व्यवसाय करत आहेत. इतकेच नाही तर बोकडाला वर्षभर मागणी असते. शहरी भागात बोकडांची खूप मागणी वाढत चालली आहे. मागणी वाढली असल्याने हा व्यवसाय शेतकऱ्यांना परवडत आहे. आता तुम्ही देखील हा व्यवसाय करू शकता.

Bullock Cart Race । बैलगाडाप्रेमींसाठी मोठी बातमी! गावागावांत रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार

महाराष्ट्र शेळी पालन योजना

तुम्हाला शेळीपालनाचा व्यवसाय करायचा असेल आणि तुमच्याकडे पैसे नसतील तर काळजी करू नका, तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय सुरु करू शकता. राज्य सरकार यापूर्वीच अनेक पशुसंवर्धन संबंधित योजनांसाठी शेतकऱ्यांना कर्ज पुरवते आणि सबसिडी देते. शेळीपालनाचे ज्ञान असणाऱ्यांना शेळीपालन योजना अंतर्गत प्राधान्य दिले जाते.

Sugarcane । चर्चा तर होणारच! महिलेने एकरी १५० टन उत्पादन घेत पटकावला राज्य पुरस्कार

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी तुमच्याकडे एवढी जमीन असली पाहिजे की ज्यामध्ये तुम्ही कमाल 100 शेळ्यांसह 5 बोकड सहज ठेवू शकता. पशुसंवर्धनाला चालना देणे हा या योजनेचा मोठा उद्देश आहे. तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाइट http://mahamesh.co.in/ वर अर्ज करू शकता.

Government Schemes । सरकारी अनुदानासह खरेदी करा जमीन, ‘या’ लोकांना मिळतोय लाभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *