Guar rate

Guar rate । मोठी बातमी! गवारीच्या दरात सर्वाधिक वाढ; पाहा किती मिळतोय दर?

बाजारभाव

Guar rate । शेतकऱ्यांना सतत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागत असतो. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत असतो. दरम्यान, शेतकरी अवकाळी पाऊस तर कधी शेतमालाला बाजारभाव नसल्याने हतबल होत असतात. यंदाही असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसाने (Unseasonal rain) राज्यातील काही भागातील पिके उध्वस्त झाली आहेत.

Bullock Cart Race । बैलगाडाप्रेमींसाठी मोठी बातमी! गावागावांत रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार

किती मिळतोय भाव?

अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गवारीचे दर सध्या गगनाला भिडले (Guar rate hike) आहेत. सोलापूर बाजारसमितीत गवारीचे दर वधारल्याचे पाहायला मिळाले आहे. आज येथे गवारीचे (Guar) कमीत कमी दर ५ हजार रुपये प्रति क्विंटल होते. कालपेक्षा आज या भावात एक हजाराने वाढ झाली आहे. तसेच अकलूज बाजारसमितीत कालच्या तुलनेत आज गवारीला तब्बल १५०० रुपयांनी जास्त दर मिळाला आहे.

Sugarcane । चर्चा तर होणारच! महिलेने एकरी १५० टन उत्पादन घेत पटकावला राज्य पुरस्कार

दरम्यान, थंडीमुळे भाजीपाला बाजारात भाज्यांची आवक कमी होत चालली आहे. याच कारणामुळे गवारीचे देखील दर प्रचंड वाढले आहेत. गवारीचे दर वाढल्याने गवार उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. येत्या काही दिवसात हे दर आणखी वाढतील, अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे. पण सर्वसामान्यांना जास्त दराने गवार खरेदी करावी लागत आहे.

Government Schemes । सरकारी अनुदानासह खरेदी करा जमीन, ‘या’ लोकांना मिळतोय लाभ

भाजीपाल्यावर यावर्षी पडलेला अवकाळी पाऊस आणि थंडीचा परिणाम होऊ लागला आहे. यामुळे भाजीपाला उत्पादनात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. उत्पादनात घट झाल्यानं मागील काही दिवसांपासून भाजीपाल्याची आवक कमी होत चालली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. यात गवारीचा देखील समावेश आहे.

Foreign tour of farmers । मोठी बातमी! राज्यातील शेतकऱ्यांना मिळाला दीड कोटींचा निधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *