Jowar Bajar Bhav । यंदा पावसामुळे सर्वच शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. वेळेत पाऊस (Rain in Maharashtra) न पडल्याने अनेक पिके जळून गेली आहेत. कमी उत्पादनामुळे धान्यांचे दर (Crop Price) वाढले आहेत. यात ज्वारीचा (Jowar) देखील समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी हे मुख्य पीक आहे. येथे ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेण्यात येते. त्यापाठोपाठ मराठवाड्यात उत्पादन घेतले जाते.
Organic Farming । सेंद्रिय शेतीसाठी सरकार देतंय 70 हजार ते 25 लाखापर्यंत अनुदान! त्वरित घ्या लाभ
गगनाला भिडले दर
यंदा ज्वारीचे दर (Jowar Price) गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. भुसार मालाच्या उत्पन्नाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने यंदा विक्रमी वाढ धान्यांच्या भावात आहे. पाथर्डीच्या बुधवारच्या आठवडे बाजारात ज्वारी ७१०० रुपये क्विंटल इतका उच्चांकी भाव घेऊन पहिल्या क्रमांकावर कायम राहिली आहे. (Jowar rate hike)
दरम्यान, सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे वितरित न केल्यास ज्वारीचे दर (Jowar rate) किमान ९ हजारांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसामुळे सध्या माल खूप कमी आहे. यामध्ये देखील जेमतेम वाढ झालेल्या ज्वारी पाखरे खातात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांच्याकडे थोडाफार माल आहे, ते विक्रीला आणत नाहीत. गाळप हंगाम आणखी महिनाभर चालेल. परंतु, त्यानंतर चाऱ्याची समस्या निर्माण होईल.
Success Story । शेतकऱ्याची कमाल! शिमला मिरचीतून कमावतोय लाखो रुपये, असं केलं नियोजन
गव्हासह बाजरीचे वाढले दर
यंदा फक्त ज्वारी नाही तर गव्हासह बाजरीचे दर गगनाला भिडले आहेत. आठवडे बाजारात बाजरी ३०००, गहू तीन ते तीन हजार ४०० रुपये, सोयाबीन ४७००, कापूस ७ हजार आणि तूर ८५०० रुपये क्विंटल पर्यंत गेली आहे. एलनिनो वादळाचा परिणाम पुढील वर्षीच्या पावसावर होण्याची शक्यता आहे. समजा असे झाले तर धान्याचे भाव आणखी वाढतील.
दरम्यान, ज्वारीच्या बाजारभावात वर्षभरात सर्वात मोठी वाढ झाली आहे. ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचे दर गगनाला भिडले आहेत. सरलेल्या मान्सूनमध्ये पावसाने घोर निराशा केल्याने ज्वारीचे दर वाढले आहेत. जर येत्या काळात बाजार समितीत कमी आवक झाली तर दर आणखी वाढू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.
Ethanol । इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांवर किती परिणाम होणार? जाणून घ्या