Onion Rate । कांद्यावर निर्यात बंदी केल्याने सध्या कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहेत. निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव मोठे घसरले आहेत. उत्पादन खर्च देखील शेतकऱ्यांचा निघत नाही. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी यावर नाराजगीही व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ठीक ठिकाणी आंदोलने देखील शेतकऱ्यांनी यासाठी केले आहेत. दरम्यान आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
भविष्यामध्ये नाफेड मार्फत 2400 प्रमाणे शेतकऱ्यांचा कांदा विकत घेण्याचा विचार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. नगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी लोकप्रतिनिधींसहन सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
नेमकं काय म्हणाले विखे पाटील?
कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडताच राज्यातील महायुती सरकारने 350 रुपयांप्रमाणे अनुदान दिले. त्याचबरोबर आघाडी सरकारच्या काळात असणाऱ्या पिक विमा शेतकऱ्यांची संख्या आणि आता आमच्या सरकारच्या काळात पिक विमा करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एकदा तपासा. केंद्रात 15 वर्ष आणि राज्यांमध्ये सत्ता असणाऱ्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या कांदा पिकाबाबत काय धोरण घेतले? असा प्रश्न उपस्थित करत भविष्यात नाफेडमार्फत 2400 रुपये प्रमाणे कांद्या कांदा विकत घेण्याचा विचार असल्याची माहिती यावेळी विखे पाटील यांनी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Success Story । दुष्काळी परिस्थितीवर मात करत फुलवली खरबुज शेती, आज होतेय लाखात कमाई
कांद्याच्या दरात घसरण सुरूच
सध्या निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आगामी काळात कांद्याचे भाव वाढतील का नाही? अशी मोठी चिंता शेतकऱ्यांसमोर आहे. जर आगामी काळात कांद्याचे भाव वाढले नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यंदाच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली आहे. यामुळे जर कांद्याला योग्य भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची देखील शक्यता आहे.
Tur Market Price । कधी वाढणार तुरीचे भाव, जाणून घ्या अभ्यासकांचे मत