Agriculture Technology । शेतकऱ्यांना शेती करताना अनेक वेगवेगळ्या आपत्तींचा सामना करावा लागतो. यामध्ये कीटकांमुळे देखील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. या कीटकांमध्ये प्रामुख्याने नाकतोडा, पाकोळ्या आणि काही फळ माशांचा समावेश असतो. या उडत्या किडीमुळे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागतो. (Insect trap device)
Success Story । दुष्काळी परिस्थितीवर मात करत फुलवली खरबुज शेती, आज होतेय लाखात कमाई
यावर उपाययोजना म्हणून बरेच शेतकरी शेतामध्ये कामगंध सापळे लावतात. मात्र या कामगंध सापळ्यामुळे देखील शेतकऱ्यांना या किडीवर म्हणावे असे नियंत्रण मिळवता येत नाही. मात्र सध्या बाजारात सोलर उर्जेवर आधारित एक यंत्र उपलब्ध आहे. ज्याच्या माध्यमातून शेतकरी या कीटकांचा प्रभावी बंदोबस्त करू शकतात. ‘कीटक सापळा यंत्र’ असे या सौर ऊर्जा आधारित यंत्राचे नाव आहे.
Tur Market Price । कधी वाढणार तुरीचे भाव, जाणून घ्या अभ्यासकांचे मत
कीटकांमुळे शेतीचे नुकसान होते आणि जर फवारणी करायची म्हटली तर शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसाही जातो. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन सौरऊर्जेवर चालणारे कीटक सापळा यंत्र विकसित करण्यात आले आहे. हे यंत्र सध्या बाजारात उपलब्ध असून शेतकरी या यंत्राचा वापर प्रभावीपणे आपल्या शेतात करू शकतात आणि पिकातील कीटकांचा बंदोबस्त करू शकतात.
Maize Rate । मकाच्या दरात सर्वाधिक वाढ! जाणून घ्या बाजारात किती मिळतोय दर?
यंत्राची किंमत किती?
कीटक सापळा यंत्र हे बाजारात सहज उपलब्ध असून या यंत्राची किंमत 2500 ते 3000 रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे कोणताही शेतकरी याची खरेदी करून आपल्या पिकांचे संरक्षण करू शकतो. या यंत्रांची विशेषत म्हणजे ते स्वयंचलित असून संध्याकाळी सहा ते सात वाजले की ते आपोआप चालू होते.
Industrial Electricity । मोठी बातमी! आता औद्योगिक वीज जोडणीच्या खर्चाचा भार उचलणार महावितरण
या यंत्रामुळे शेतकऱ्यांना कीटकनाशकावरील खर्च कमी होणार आहे. अनेक शेतकरी या ‘]कीटक सापळा यंत्राचा वापर आपल्या शेतात करत असून तुम्ही देखील या यंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्याही फवारणीवरील खर्च निम्मा होईल. बाजारात विविध प्रकारचे कीटक सापळा यंत्र उपलब्ध आहेत. तुम्ही हे यंत्र खरेदी करताना याची संपूर्ण खात्री आणि माहिती घेऊनच खरेदी करावी. जेणेकरून आपल्याला कीटकांपासून प्रभावीपणे पिकांचे संरक्षण करता येईल.
Grape rates । धक्कदायक! करपा रोगाचा प्रादुर्भावामुळे द्राक्ष उत्पादकांचे तब्बल ३०० कोटींचे नुकसान