Grape rates । निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदाही सर्व शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळी पावसाने अनेक पिकांची नासाडी झाली आहे. त्यात काही पिकांवर रोग देखील पडला आहे. यामुळे पिके धोक्यात आली आहेत. अनेक शेतकरी फळबागा लावून चांगली कमाई करत आहेत. पण यंदा मात्र याउलट चित्र आहे. अवकाळी पावसाने फळबागांचे (Orchards) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि ढगाळ वातावरणाचा फटका द्राक्ष उत्पादकांना (Grape growers) बसला आहे. मागील काही दिवसांपासून द्राक्षाचे दर अचानक कमी झाले आहेत. शिवाय सांगली भागातील द्राक्ष (Grapes) बागांवर बुरशीजन्य करपा रोग पडला आहे, त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या भागात करप्याचा प्रादुर्भाव झालेल्या द्राक्षांच्या घडाला (Grape price) रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे.
Advance Crop Insurance । ब्रेकिंग न्यूज! ‘या’ जिल्ह्यात २१४ कोटी ६२ लाख रुपयांचा अग्रिम विमा वाटप
दरात झाली घसरण
इतकेच नाही तर निर्यातीसाठी होणारी पॅकिंग देखील बंद पडली आहे. १२० ते १४० रूपयांचे असणारे दर थेट ५० ते ६० रूपयांवर आले आहेत. अचानक पडलेल्या दरामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पुण्यात येऊन द्राक्षाची थेट ग्राहकांना विक्री करत आहेत. जर हे चित्र असेच राहिले तर शेतकऱ्यांवर आणखी वाईट वेळ येऊ शकते, हे नक्कीच.
Intercropping in Sugarcane । ऊसामध्ये आंतरपीक घेणे फायद्याचे की तोट्याचे? वाचा महत्वाची माहिती
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील तब्बल ५ हजार एकर क्षेत्रावरील द्राक्षबागांवर बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगामुळे द्राक्षाच्या घडांवर काळे डाग पडले आहेत. त्यामुळे या मालाला लोकल मार्केटमध्ये दर मिळत नाही. त्यामुळे अशी द्राक्ष रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. निर्यातक्षम द्राक्ष बाधित झाल्यामुळे शेतऱ्यांचे जवळपास ३०० कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान देखील झाले आहे.
Goat rearing । दूध दर झाले कमी, पशुपालकांचा वाढला शेळीपालनाकडे कल