Maize Import

Maize Import । आता भारतात येणार म्यानमारची मका, आयातीसाठी सरकारच्या हालचाली सुरु

बातम्या

Maize Import । मका (Maize) हे असे पीक आहे जे खरिप आणि रब्बी हंगामात लागवड करता येते. मका अन्नधान्य, पशुखाद्य, पोल्ट्री खाद्य, मूल्यवर्धित पदार्थ असे बहुउपयोगी पीक असल्याने अनेक शेतकरी याची दरवर्षी मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. भरघोस उत्पादन मिळवून देणारे पीक (Maize price) म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. यंदा मका उत्पादकांना चांगले दिवस आले आहेत.

दरात होणार वाढ

इथेनॉल निर्मितीसाठी (Ethanol production) मक्याची मागणी चांगलीच वाढली आहे. स्वदेशी मका वापरल्याने देशांतर्गत मक्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Maize price hike) केंद्राने 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याचे निश्चित केले असून यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला असल्याने देशातील ऊस उत्पादनात घट नोंदवण्यात आली आहे.

म्यानमारची मका आयात होणार?

दरम्यान, देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमतींची वाढ होऊ नये, यासाठी सरकारकडून उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास मर्यादित स्वरूपात परवानगी दिली आहे. सरकारला आपले इथेनॉल निर्मितीचे लक्ष्य पूर्ण करण्यात अडचण निर्माण झाल्याने इथेनॉल उद्योगाकडून आणि आयतदारांकडून म्यानमारची मका आयात करण्यासाठी प्रयत्न सुरू झाली आहे, अधिकृतरित्या सांगितले जात आहे. (Maize will be imported from Myanmar)

यंदा देशातील काही राज्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मका उत्पादन प्रभावित झाले असून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये एकरी मका उत्पादनात मोठी घट नोंदवण्यात आली आहे. सध्या देशात मक्याचा मर्यादित साठा शिल्लक असल्याने इथेनॉल निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी विदेशातून मोठ्या प्रमाणात मका आयात (Maize Import From Myanmar) करण्याची गरज आहे.

नुकतंच केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी राखीव साठ्यातील तांदूळ वापरण्यास मनाई केली असून देशातील ऊस उत्पादन ही मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मिती उद्योग अडचणीत सापडला आहे. म्यानमार या देशातून मका आयात करण्यासाठी इथेनॉल उद्योग आणि आयतदारांकडून योजना बनवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *