Government schemes । शेती व्यवसायात शेतकऱ्यांची चांगली प्रगती व्हावी, शेती उत्पन्न हे दुपटीने वाढावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना (Agri schemes) राबवत असते. ज्याचा शेतकरी लाभ घेत असतात. शेतकऱ्यांना दरवर्षी अडचणी लक्षात घेता सरकारने योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. अलीकडच्या काळात शेतकरी फळबागांची लागवड करण्यास प्राधान्य देत आहे.
Maize Import । आता भारतात येणार म्यानमारची मका, आयातीसाठी सरकारच्या हालचाली सुरु
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
तुम्ही आता सरकारी मदत घेऊन फळबागांची लागवड (Orchard Plantation Scheme) करू शकता. कृषी विभागाकडून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme) राबवली जात आहे. या योजनेला २०२३-२४ या वर्षासाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त निधीसाठी मान्यता दिली होती. सरकारकडून या योजनेसाठी १०४ कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे. फलोत्पादन संचालकांच्या मागणीनंतर वीस कोटींचा निधी कृषी विभागाला उपलब्ध करून दिला आहे.
Havaman Andaj । पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या हवामान खात्याचे अपडेट
याचा सर्वात मोठा फायदा फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांना होईल. हा निधी सुरूवातीला प्रलंबित प्रकरणांच्या दायित्वासाठी वापरला जाईल, हे लक्षात घ्या. त्यानंतर उरलेला निधी चालू वर्षासाठी वापरण्यात येईल. या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन सदरचा अहवाल कृषी आयुक्तामार्फत शासनाकडे सोपवण्याचे आदेश फलोत्पादन संचालकांना दिले आहेत.
LPG Cylinder । घरबसल्या Whatsapp वरुन बुक करा गॅस सिलेंडर, कसं ते जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
काय आहे योजना? जाणून घ्या
राज्य सरकारच्या कृषी विभागाने राज्यातील फलोत्पादन क्षेत्र वाढण्यासाठी २०१८ च्या जुलैमध्ये माजी कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली होती. यात एकूण १५ फळपिकांचा सामावेश आहे. या योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान दिले जाते.
Farmer strike । शेतकरी करणार 26 जानेवारीला देशभरात मोर्चा, नेमकं कारण काय?
इतकेच नाही तर या योजनेअंतर्गत पीक संरक्षण, नांग्या भरणे, लागवड करणे, ठिबक सिंचन, खड्डे खोदणे, खतांसाठी १०० टक्के अनुदान दिले जाते. या योजनेसाठी अर्थसंकल्पात कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी १०० कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली होती. आनंदाची बाब म्हणजे आता नवीन शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
Tur Market Price । तूर उत्पादकांसाठी खुशखबर! दर गेले 10 हजाराच्या घरात, जाणून घ्या