Kisan Mandhan Yojana

Kisan Mandhan Yojana । सरकारची नवीन योजना! दरमहा शेतकऱ्यांना मिळणार 3 हजार रुपये, असा करा अर्ज

शासकीय योजना

Kisan Mandhan Yojana । राज्य आणि केंद्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत करत असते. ज्याचा त्यांना फायदा होत असतो. परंतु अनेक शेतकऱ्यांना सरकारच्या या योजनांची (Government Schemes) माहिती नसते, त्यामुळे त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही. दरम्यान, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किसान मानधन योजनेची सुरुवात केली आहे. याचा देशभरातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपयांचा निधी मिळतो.

Success Story। शेतकरी दाम्पत्याचा अनोखा प्रयोग! मेहनतीच्या जोरावर रानभाजी लागवडीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न

जाणून घ्या पात्रता

या योजनेसाठी 18 ते 40 वय असणारे शेतकरी पात्र आहेत. लाभार्थी शेतकऱ्याचे वय 60 वर्षे झाले की त्याला प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जातात. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही प्रधानमंत्री किसान मानधन योजनाच्या (PM Kisan Mandhan Yojana) अधिकृत साईटवर जाऊन नोंदणी करू शकता. तुम्हाला प्रत्येक महिन्याला 55 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

Gadchiroli Farmer News । धक्कादायक बातमी! शेतकऱ्यांनी दिला संपुर्ण कुटुंबांसह आत्मदहनाचा इशारा; नेमकं कारण काय?

असा करा अर्ज

  • सर्वात अगोदर तुम्हाला प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • होमपेजवर लॉगिन करा
  • अर्ज दाखल करण्यासाठी तुमचा चालू फोन नंबर टाकावा.
  • त्यानंतर विचारण्यात आलेली आवश्यक माहिती भरा
  • आता तुमच्या मोबाईल नंबरवर येईल ओटीपी येईल तो टाका.
  • सर्वात शेवटी अर्ज सबमिट करून या अर्जाची प्रिंट काढा.

Animal husbandry । कौतुकास्पद! ‘या’ गावातील सर्व महिला पाळतात गाई, महिन्याला कमावताहेत हजारो रुपये

आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • बँक खाते पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • वय प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र

Soil testing । भारीच की! पोस्टाने परीक्षणासाठी पाठवता येणार माती, आठवड्यात मिळेल अहवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *