Gadchiroli Farmer News । शेतकऱ्यांना शेती करताना कधी कोणत्या समस्येला सामोरे जावे लागेल, हे सांगता येत नाही. अनेकदा त्यांना अवकाळी पाऊस, पूर आणि कमी बाजारभाव यांसारख्या समस्येला सामोरे जावे लागते. बऱ्याचवेळा शेतकरी शेतमालाला कमी बाजारभाव मिळाल्याने रस्त्यावर उतरतात, अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या संपुर्ण कुटुंबांसह आत्मदहनाचा इशारा दिला आहे. (Agriculture News)
Animal husbandry । कौतुकास्पद! ‘या’ गावातील सर्व महिला पाळतात गाई, महिन्याला कमावताहेत हजारो रुपये
गडचिरोली जिल्ह्यात हत्तीच्या (Elephants) कळपांनी धुमाकूळ घातला आहे. या हत्तींनी पिकांचे खूप नुकसान (Huge loss due to Elephants) केले आहे. देसाईगंज तालुक्यापासून 16 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हलबी पिंपळगाव येथील शेतकरी जंगली हत्तींनी हतबल झाले आहेत. याहून महत्त्वाची बाब म्हणजे या शेतकऱ्यांना (Farmer News) प्रशासनाकडून खूप कमी मदत मिळाली, त्यामुळे त्यांच्यावर आणखी संकट आले आहे.
Soil testing । भारीच की! पोस्टाने परीक्षणासाठी पाठवता येणार माती, आठवड्यात मिळेल अहवाल
एकरी 50 हजार रुपये मदत द्या
संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता एक टोकाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी देसाईगंज तहसीलदारामार्फत प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात संपूर्ण कुटुंबांसह आत्मदहनाचा इशारा दिला आहे. तातडीने नुकसानीच्या प्रमाणात कमीत कमी 50 हजार रुपये प्रती एकर आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
Lemon Market । शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण! लिंबांचे वाढले भाव, क्विंटलला मिळतोय ‘इतका’ दर
शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी पूर्वी ही रक्कम जमा झाली पाहिजे, नाहीतर संपुर्ण कुटुंबासह सामुहिक देहत्याग करण्याशिवाय पर्याय शिल्लक नसल्याचं शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळं आता सरकार कोणता निर्णय घेणार याकडं सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.