Leopards Attack । सध्या जंगलामध्ये वन्य प्राण्यांना पुरेसे खाद्य उपलब्ध नाही. त्यात वनक्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरकाव करण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. सध्या उसाची तोडणी (Cutting sugarcane) सुरु आहे. परंतु, ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. कामगारांना बिबट्याचे (Leopard) दर्शन होत आहे.
Crab farming । खेकड्याची शेती नेमकी कशी करावी? त्याच्या पद्धती कोणत्या? जाणून घ्या A to Z माहिती
या दिवसांत बिबटे पाण्याच्या शोधात बाहेर पडत आहेत. अनेकदा ऊसतोड (sugarcane) सुरु असताना बछडे आणि रात्रीच्या सुमारास बिबटे आढळून येत आहेत. काहीवेळा ऊसतोड कामगारांवर हल्ले होतात. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेचा (Safety of sugarcane workers) मुद्दा गंभीर बनत चालला आहे. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यासह निफाड, सिन्नर, येवला भागात ऊस तोडणीचे काम सुरु आहे.
ऊसतोड कामगारांचा जीव धोक्यात
यावेळी हमखास बिबट्याचे दर्शन होते. ऑक्टोबर आणि नोंव्हेबर महिन्यामध्ये ऊसतोड कामगार मुलाबाळांसह ऊसतोडीसाठी शेतात येत असतात. ऊसतोड सुरु असताना लहान मुलं आजूबाजूला उसाच्या सरीत बसलेले असतात. काहीवेळा अचानक त्यांच्या नजरेस बिबट्या पडतो आणि सर्वांचीच तारांबळ उडते. अशावेळी ऊसतोड कामगार स्वतःचा जीव वाचवू कि मुलांना बघू अशी परिस्थिती निर्माण होते.
अनेकदा गावकरी आणि आजूबाजूला असणाऱ्या कामगारामुळे जीव वाचतो. परंतु ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. शेतकरी वनविभागाकडे बिबटे पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे पिंजरा लावण्याबाबत कायदेशीर बाब असल्याचे वनविभागाकडून सांगितले जात आहे.
Tur Market । शेतकऱ्यांना मोठा दिलासा! सरकार करणार बाजारभावाने तूर खरेदी
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले हे स्पष्टीकरण
दरम्यान, याबाबत वनविभागाकडून जनजागृती सुरु आहे. ज्या ठिकाणी ऊसतोड सुरु आहे. त्या ठिकाणी जाऊन जनजागृती करण्यात येते. बिबट्या नजरेस पडल्यानंतर काय काळजी घ्यावी? काय करावं याबाबत सांगितले जाते. स्थानिक शेतकरी पिंजरा लावण्याची मागणी करत असून पिंजरा लावण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून निर्णय घ्यावा लागत असल्याचे निफाडचे आरएफओ अक्षय मेहेत्रे यांनी सांगितले आहे.
Success Story । ऑनलाईन हुरडा विकून मराठवाड्यातील तरुण करताहेत लाखोंची उलाढाल, अशी केली सुरुवात