Havaman Andaj

Havaman Andaj । मोठी बातमी! राज्याला पुन्हा बसणार अवकाळीचा फटका, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

हवामान

Havaman Andaj । यंदा पावसाने शेतकऱ्यांचे गणित बिघडवले आहे. पावसाने राज्याच्या (Rain in Maharashtra) काही भागात रब्बी हंगामात पाठ फिरवली. त्यामुळे पिके जळून गेली. तर खरीप हंगामात हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला. अवकाळी पावसाने (Heavy Rain) शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. शेतकरी अजूनही या संकटातून सावरू शकला नाही. अशातच आता हवामान खात्याने पावसाचा अंदाज (IMD Update) वर्तवला आहे.

Leopards Attack । ऊसतोड कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर, बिबट्याच्या वावराने भीतीचे वातावरण

नवीन वर्षाची सुरुवात होण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. हवामान खात्याने आता या वर्षाच्या शेवटी आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला पावसाचा अंदाज (IMD Alert) वर्तवला आहे. हवामान खात्याने शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा (IMD Rain Alert) दिला आहे. ३१ ते १ जानेवारी रोजी राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Crab farming । खेकड्याची शेती नेमकी कशी करावी? त्याच्या पद्धती कोणत्या? जाणून घ्या A to Z माहिती

‘या’ ठिकाणी पडणार पाऊस

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, देशातील तामिळनाडूतील किनारपट्टीवर ३० डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत पाऊस पडेल. पश्चिम राजस्थान, उत्तर प्रदेशमधील काही भाग आणि दिल्ली एनसीआरमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये पावसाची शक्यता खूप कमी आहे.

Rain Gauge । राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत बसणार पाऊस मोजण्याचे यंत्र, कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

२७ ते ३१ डिसेंबरदरम्यान पंजाबमध्ये सकाळच्या वेळी दाट धुके पडतील. हरियाणाचा काही भाग, चंडीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्येही दाट धुके पडतील. हवामान विभागाच्या खासगी संस्था स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार, ३० ते १ जानेवारी दरम्यान पाऊस पडेल. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडण्यापूर्वी हवामानाचा अंदाज घेणे महत्त्वाचे आहे.

Agricultural Exhibition । शेतकऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी! ‘या’ ठिकाणी २७ डिसेंबरपासून ‘ॲग्रोटेक’ कृषी प्रदर्शन!

शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

दरम्यान, मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. अवकाळी पावसामुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. मागील काही वर्षांपासून हिवाळ्यात पाऊस पडण्याचा घटना वाढत आहे. त्याला कारण आहे ते म्हणजे पश्चिम आणि पूर्वेकडील वारे. हे दोन्ही वारे महाराष्ट्रात भिडत असल्यामुळे हिवाळ्यात गारपीट आणि पाऊस पडत आहे, असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

Tur Market । शेतकऱ्यांना मोठा दिलासा! सरकार करणार बाजारभावाने तूर खरेदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *