Crab farming । खेकड्याला इंग्रजीत क्रॅब (Crab) असे म्हणतात. जरी शाकाहारी लोकांसाठी हा एक विचित्र प्राणी असला तरी मांसाहारी खास करून मासे प्रेमींसाठी (Fish lovers) खेकडा ही एक प्रकारची मेजवानी आहे. त्यामुळे अनेकजण शेतीला पूरक व्यवसाय म्हणून खेकडा पालन व्यवसाय (Crab farming business) सुरु करतात. या व्यवसायातून लाखोंचं उत्पन्न मिळते. सोप्या पद्धतीने खेकड्याची शेती केली जाते.
मागील काही दशकांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International markets) खेकड्याला चांगली मागणी आहे. आशियाई देशांमध्ये खेकडापालनाच्या नवनवीन पद्धती (Methods of Crab Farming) आहे. तीन पद्धतीने खेकडा शेती करू शकता. तलाव पध्दत, खाडीमध्ये बंदिस्त पध्दत आणि तलावांमध्ये बंदिस्त तरंगत्या क्रेट्समध्ये तुम्ही खेकड्यांची शेती करू शकता. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. (Crab farming information)
- तलाव पध्दत
तलावात खेकड्यांची पिल्ले सोडण्यात येतात. या पिल्लांना योग्य त्या प्रमाणात खाद्य दिले जाते. महिन्यातून दोन वेळा म्हणजे अमावस्या आणि पोर्णिमेच्या उधाणाच्या भरतीने समुद्राचे पाणी तलावामध्ये येते आणि निघून जाते. त्यामुळे या पध्दतीत खेकडे निसटून जाण्याचे प्रमाण अधिक असते.
Tur Market । शेतकऱ्यांना मोठा दिलासा! सरकार करणार बाजारभावाने तूर खरेदी
- खाडीमध्ये बंदिस्त पध्दत
या पध्दतीने खाडीमध्ये ज्या ठिकाणी समुद्राच्या भरतीचे पाणी १ मी. उंच आणि ओहोटीचे पाणी १ फूटपर्यंत रहाते अशी योग्य जागा निवडा. या जागेला चारही बाजूनी कुंपण घालून आतील आणि बाहेरील बाजूला जाळी लावा. ही जाळी ओहोटीच्या वेळी जमिनीमध्ये १ फूट खोलवर पुरून टाका.
Success Story । ऑनलाईन हुरडा विकून मराठवाड्यातील तरुण करताहेत लाखोंची उलाढाल, अशी केली सुरुवात
- प्लॅस्टिकचे क्रेट्स
हे क्रेट्स दोन बांबूच्यामध्ये एका सरळ रेषेत बांधतात. या बांबूना ठरावीक ठिकाणी फ्लोट्स लावून हे क्रेट्स तरंगतात. या क्रेट्समधील खेकड्यांना खाद्य देण्यासाठी, निरीक्षण करणेसाठी वरचे बाजूस छीद्रे तर आतील विष्टा आणि न खाल्लेले अन्न बाहेर जाण्यासाठी क्रेट्सच्या खालच्या बाजूस छीद्रे असतात. परंतु, एक गोष्ट लक्षात ठेवा की या पध्दतीमध्ये तलावातील पाण्याची पातळी कमी झाली आणि पाणी किंवा प्लॅस्टिकचे क्रेटस तापले तर खेकड्यांना धोका असतो.
Subsidy for Well । मोठी बातमी! आता विहिरीसाठीही मिळेल अनुदान, ग्रामपंचायतीत द्यावा लागेल प्रस्ताव
याप्रकारे तुम्ही खेकड्याची शेती करू शकता. पूर्वी निसर्गतः खाडीमधून मोठ्या प्रमाणात खेकडे मिळत होते. परंतु आता खेकडे मिळण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. सध्या खेकड्यांची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे, यामुळे शेतकऱ्यांना यामध्ये चांगला नफा मिळत आहे. त्यामुळे खेकडा शेती हे उत्पन्नाचे चांगले साधन ठरू शकते.
Success Story । उच्च शिक्षित तरुणाची लै भारी कमाल, शिमला मिरचीतून मिळवला बक्कळ नफा