Tur Market

Tur Market । शेतकऱ्यांना मोठा दिलासा! सरकार करणार बाजारभावाने तूर खरेदी

बातम्या

Tur Market । यावर्षी पावसाने तुरीचे (Tur) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे यंदा उत्पादनात आणखी घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन हंगामात तुरीला चांगला भाव (Tur Price) मिळू शकतो. आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. अशातच आता तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Tur producer farmers) दिलासादायक बातमी आहे.

Land rule । तुम्हालाही जमीन नाही का? तर मग ‘या’ ठिकाणी करा अर्ज, मिळेल जमीन

८ ते १० लाख टन तूर खरेदी करणार

यावर्षी केंद्र सरकार (Central Govt) शेतकऱ्यांकडून हमीभावाने नाही तर बाजारभावाने ८ ते १० लाख टन तूर खरेदी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यात तुरीचे दर कमी करण्यासाठी सरकार आता खरेदी केलेली तूर बाजारात आणण्याची शक्यता आहे, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहे.

Success Story । ऑनलाईन हुरडा विकून मराठवाड्यातील तरुण करताहेत लाखोंची उलाढाल, अशी केली सुरुवात

सरकार निवडणुकीच्या तोंडावर सर्व शेतमालाचे दर कमी करत आहेत. परंतु तुरीचे नाही. देशातील कमी उत्पादन आणि आयातीवरील मर्यादेमुळे सरकारने हा निर्णय घेतला नाही. जर हरभऱ्याप्रमाणे तुरीचा स्टाॅक असता तर तो कमी दरात बाजारात आणून दर कमी करता आले असते. त्यामुळे आता सरकार खेरदी केलेली तूर खुल्या बाजारात विकेल. परंतु, गरिबांना रेशनवरही स्वस्त तूर डाळ देईल.

Success Story । उच्च शिक्षित तरुणाची लै भारी कमाल, शिमला मिरचीतून मिळवला बक्कळ नफा

बाजार भावाने केली जाईल खरेदी

दरम्यान, यावर्षी सरकारने हमीभावाने नाही तर बाजार भावाने तूर खरेदीचा मोठा निर्णय घेतला. एकंदरीतच यावर्षी नाफेडला किंवा एनसीसीएफला तूर विकली तर हमीभाव असलेला ६ हजार ६०० रुपये दर मिळणार नाही. सरकारला तुरीचे दर वर्षभर कमी ठेवयाचे असेही, केवळ आपली निवडणूक झाली की झालं, हे सरकारचं धोरण दिसतं, असे जाणकारांचे मत आहे.

Subsidy for Well । मोठी बातमी! आता विहिरीसाठीही मिळेल अनुदान, ग्रामपंचायतीत द्यावा लागेल प्रस्ताव

परंतु, सरकार किती तूर खरेदी करणार याचा निश्चित आकडा समोर आला नाही. सरकारला जर तूर बाजारात हस्तक्षेप करून हरभऱ्याप्रमाणे दर स्थिर ठेवायचे असतील तर १० लाख टनांच्या दरम्यान खरेदी करावी लागणार आहे. केंद्रीय सहकार विभागाने यापुर्वी ८ ते १० लाख टन खरेदीचे उद्दीष्ट आहे, असे सांगितले होते. साहजिकच सरकार इतकी तूर खरेदी करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Drought in Maharashtra । भीषण वास्तव! तब्बल ५४ लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही दुष्काळ, अवकाळीची मदत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *