Agricultural Exhibition

Agricultural Exhibition । शेतकऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी! ‘या’ ठिकाणी २७ डिसेंबरपासून ‘ॲग्रोटेक’ कृषी प्रदर्शन!

बातम्या

Agricultural Exhibition । बदलत्या काळानुसार शेतीत आता बदल होऊ लागले आहेत. शेतकरी आता पारंपरिक पद्धतीने नाही तर आधुनिक पद्धतीने पिके (Modern crops) घेऊ लागले आहेत. आधुनिक पिकांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. तसेच शेतीशी निगडित कामे सोयीस्कर व्हावीत यासाठी अनेक यंत्रे (Agriculture machines) बाजारात दाखल होऊ लागली आहेत. शिवाय केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना (Government Schemes) सुरु करतात.

Success Story । ऑनलाईन हुरडा विकून मराठवाड्यातील तरुण करताहेत लाखोंची उलाढाल, अशी केली सुरुवात

‘ॲग्रोटेक’ कृषी प्रदर्शन

अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात (Akola Agriculture University) कृषी क्रांतीचे जनक आणि देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंती दिनानिमित्त 27 ते 29 डिसेंबर या काळात तीन दिवसीय राज्यस्तरीय ‘ॲग्रोटेक’ कृषी प्रदर्शन (Agrotech Exhibition), कृषी महोत्सव आणि चर्चासत्राचे आयोजन केले आहे. (Agrotech Exhibition In Akola Agriculture University)

Tur Market । शेतकऱ्यांना मोठा दिलासा! सरकार करणार बाजारभावाने तूर खरेदी

ही दालने असणार

चारशेपेक्षा अधिक दालने या प्रदर्शनात असतील. राज्यभरातील विद्यापीठांमध्ये निर्मित प्रगत कृषी तंत्रज्ञान, राज्य सरकारचा कृषी विभाग, जैविक शेती मिशनसह विविध राष्ट्रीय तथा राज्य पातळीवरील शेती आणि ग्रामविकासाशी संबंधित संस्था, यंत्र अवजारे निर्माण करणाऱ्या कंपन्या, कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्या,बी-बियाणे खते, कीटकनाशके, सेंद्रिय निविष्ठा उत्पादक कंपन्या यासह कृषी विद्यापीठातून शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या आणि स्वतः उद्योजक म्हणून सेवारत असणाऱ्या कृषी पदवीधरांची दालने असतील.

Success Story । उच्च शिक्षित तरुणाची लै भारी कमाल, शिमला मिरचीतून मिळवला बक्कळ नफा

त्याशिवाय विदर्भातील स्वंयसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून निर्मित कृषी पूरक उत्पादने आणि विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील या प्रदर्शनाचे आकर्षण असतील. आधुनिक शेती व्यवसायातील विविध नावीन्यपूर्ण संधींचे प्रदर्शन शेतकऱ्यांना पाहायला मिळेल. याशिवाय पीक संरक्षणाच्या विविध पद्धती, ड्रोन तंत्रज्ञानासह स्वयंचलित यंत्रे -अवजारे,औषधी व सुगंधी वनस्पतींच्या अनेकानेक जाती, फळे- फुले, रानभाज्यांचे प्रदर्शन लक्षवेधी ठरेल.

Subsidy for Well । मोठी बातमी! आता विहिरीसाठीही मिळेल अनुदान, ग्रामपंचायतीत द्यावा लागेल प्रस्ताव

हे कृषी प्रदर्शन राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुले असेल. भरपूर माहिती मिळत असल्याने या प्रदर्शनाला लाखो शेतकरी आणि नागरिक भेट देतील. शेती निविष्ठा कंपनीच्या थेट महत्त्वाच्या व्यक्तींशी बोलण्याची संधी मिळणार आहे. शिवाय तुम्हाला विविध वस्तू खरेदी करता येतील. जर तुम्हाला नवनवीन विषयाची माहिती जाणून घ्यायची असेल तर ही संधी चुकवू नका.

Drought in Maharashtra । भीषण वास्तव! तब्बल ५४ लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही दुष्काळ, अवकाळीची मदत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *