Maharashtra Drought

Maharashtra Drought । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील ९५९ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर

बातम्या

Maharashtra Drought । यावर्षी पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. नुकताच राज्य सरकारने महाराष्ट्रातील एकूण ४० तालुक्यात दुष्काळ (Drought) जाहीर केला आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. कारण ज्या महसूल मंडलांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा एकूण १७८ तालुक्यांतील ९५९ महसूल मंडलांमध्ये दुष्काळ (Drought in Maharashtra) जाहीर करण्यास मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता दिली आहे.

Post Monsoon Rain । अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, हजारो हेक्टर पिकांचे नुकसान

दरम्यान, आतापर्यंत जाहीर आकडेवारीनुसार ५० टक्क्यांपेक्षा जास्त महसूल मंडलांत दुष्काळी परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले आहे. या महिन्याच्या शेवटी होणाऱ्या एकूण २०६८ महसूल मंडलांमध्ये दुष्काळी परिस्थिती असली तरी पुढील बैठकीत उर्वरित महसूल मंडलांच्या प्रस्तावांवर चर्चा केली जाईल. नुकतीच मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली.

Agricultural University । हे आहे देशातील पहिले कृषी विद्यापीठ, कधी आणि कोठे स्थापन झाले जाणून घ्या

शिवाय राज्यात पशुधनासाठी चारा निर्माण होण्याकरिता तब्बल १ लाख लाभार्थ्यी शेतक-यांना ५ लाख टन मूरघास निर्मिती करून वितरण केला जाईल. यासाठी येणा-या ३० कोटी रुपयांच्या खर्चाला यावेळी मान्यता मिळाली आहे. यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. या शिवाय दुष्काळ जाहीर केलेल्या मंडळात कोणत्या सुविधा मिळणार? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

Rules of Land । शेतजमिनीवर घर बांधतायं? जाणून घ्या नियम नाहीतर पाडावे लागेल घर..

मिळणार या सवलती

दुष्काळग्रस्तांना पीक कर्जाचे पुनर्गठन, जमीन महसूलात घट, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, कृषी पंपांच्या वीज बिलात ३३.५ टक्के सूट तसेच टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपांची वीज जोडणी खंडित केली जाणार नाही.

Agri Business । पशुपालकांची होणार चांदी! सुरु करा शेणापासून फरशा बनवण्याचा व्यवसाय, होईल बक्कळ कमाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *