Hailstorm । शेतकऱ्यांना गारपिटीचा मोठा फटका! तब्बल २० कोटीचे झाले नुकसान

बातम्या

Hailstorm । राज्यातला शेतकरी यंदा चांगलाच हवालदिल झाला आहे. याला कारणही अगदी तसेच आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात राज्यातील अनेक भागात पावसाने (Rain in Maharashtra) पाठ फिरवली. पाऊस न पडल्याने ठिकठिकाणी पेरण्या रखडल्या. त्यांनतर हिवाळ्याच्या दिवसात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.

Onion Storage । शेतकऱ्यांनो, कांदा चाळीत साठवायचा असेल तर ही योजना येईल तुमच्या कामी

अशातच आता शेतकऱ्यांना पुन्हा एकदा गारपिटीने चांगलेच झोडपून काढले आहे. (Hailstorm in Maharashtra) गारपिटीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात ११ आणि १२ एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली. निसर्गाच्या लहरीपणामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Onion Market । मोठी बातमी! बाजार समित्या नाही तर शेतकरी संघटना सुरू करणार कांद्याचे लिलाव

२० कोटीचे झाले नुकसान

गारपिटीमुळे फळबागा, शेडनेट, उन्हाळी पिके यांचे तब्बल २० कोटी ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून सध्या वर्तवण्यात येत आहे. यामुळे ३०० हेक्टरवरील रब्बी पिके, फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसेच बाजरी, मका, कांदा सिड्स, भाजीपाला याचेही खूप नुकसान झाले आहे.

Bank Loan । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ कामासाठी बँक ऑफ महाराष्ट्र देणार लाखांचे कर्ज

गारपिटीमुळे १०० शेडनेटचे नुकसान झाले. या शेडनेटमध्ये मिरचीचे रोप लावले होते. ते देखील निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे. काही शेतकऱ्यांची तोडणीला आलेली मिरची खाली पडल्याने पिवळी होऊन सडू लागली आहे. यात एकूण ५० शेतकऱ्यांचे प्रत्येकी एक लाखांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

Sorghum Market । शेतकऱ्यांना अच्छे दिन! पांढऱ्या ज्वारीला मिळतोय हंगामातील सर्वात जास्त भाव

शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

त्यामुळे आता हे शेतकरी सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहेत. दरम्यान, तहसीलदार रूपेश खदारे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे यांनी कर्मचाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले असून यानुसार १० पैकी ५ गावांमधील नुकसानीचे पंचनामे देखील पूर्ण झाले आहेत. लवकरच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल.

LPG Cylinder । सर्वसामान्यांना निवडणुकीची भेट, आजपासून एलपीजी सिलिंडरचे दर इतक्या रुपयांनी झाले कमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *