Sugarcane FRP । भरघोस उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून उसाची ओळख (Sugarcane) आहे. त्यामुळे देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात येते. जर तुम्ही उसाची लागवड (Cultivation of sugarcane) करत असाल तर त्यासाठी योग्य ते नियोजन करणे खूप गरजेचे आहे. तरच तुम्हाला यातून जास्त उत्पन्न मिळू शकते. यंदा मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे.
Drought Condition । सरकार दुष्काळ निवारणीसाठी उचलणार ठोस पाऊल, अजितदादांचे आश्वासन
सरकारकडून उसाच्या एफआरपीमध्ये (FRP) आठ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना प्रतिटन उसामागे २५० रूपयांचा जास्त दर मिळणार असून या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३ हजार १५० रूपये प्रतिटन हमीभाव मिळत आहे. तर पुढील हंगामात प्रतिटन ३ हजार ४०० रूपये मिळेल. पण एफआरपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा असला तरी साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ झाली नाही.
Jowar Rate । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ज्वारीची आवक वाढताच दरात झाली मोठी घसरण, जाणून घ्या नवीन दर
कारखान्यांवरील वाढेल ताण
त्यामुळे कारखानदार अडचणीत येतील. दरम्यान, २०२३-२४ च्या हंगामासाठी सरकारने ३ हजार १५० रूपये प्रतिटन एफआरपी दर जाहीर केला होता. अशातच हा हंगाम संपण्यापूर्वी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारने एफआरपीमध्ये ८ टक्क्यांनी वाढ केली. २०२४-२५ च्या हंगामात शेतकऱ्यांना ३ हजार ४०० रूपये प्रतिटन उसाला दर मिळाला तर कारखान्यांवरील ताण आणखी वाढेल.
२०१९ पासून चार हंगामात एफआरपीमध्ये वाढ होत असून तुलनेने साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ झाली नाही. सध्या साखरेला ३ हजार १०० रूपये एमएसपी लागू असल्याने आता कारखानदारांना उस घेण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे तर लागणारच आहेत पण साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ झाली नसल्याने तोटा होणार आहे.
शेतकऱ्यांना होईल तोटा
आगामी हंगामात जर साखरेची एमएसपी वाढली नाही तर कारखान्यांना मिळणारे कर्ज किंवा त्यांच्याकडील शिल्लक रक्कम आणि शेतकऱ्यांना अदा करावयाची रक्कम यात तफावत येईल. शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे एमएसपीमध्ये वाढ न झाल्याचा अप्रत्यक्षपणे फटका शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे.
PM Kisan Yojana । शेतकऱ्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट! खात्यात येणार करोडो रुपये, कसं ते जाणून घ्या