E-Peak Inspection

E-Peak Inspection । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळी सवलतींसाठी ई-पीक पाहणी अनिवार्य

बातम्या

E-Peak Inspection । यंदा शेतकऱ्यांना निसर्गाने खूप मोठा धक्का दिला आहे. ऐन पावसाळ्यातच अनेक भागात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे राज्यात दुष्काळ (Drought in Maharashtra) परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस वेळेत न पडल्याने अनेक पिके जळून गेली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चाऱ्याची मागणी जास्त असल्याने चाऱ्याच्या किमती महाग झाल्या आहेत.

Sugarcane FRP । एफआरपी कितीही वाढवला तरी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार

ई-पीक पाहणी अनिवार्य

दुष्काळी सवलती (Drought concessions) मिळण्यासाठी देखील आता जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. खरीप हंगामातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी नोंदणी (E-Peak Inspection Registration) बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी निराश झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ८५०० रुपयांची मदत मिळणार आहे.

Drought Condition । सरकार दुष्काळ निवारणीसाठी उचलणार ठोस पाऊल, अजितदादांचे आश्वासन

तर तालुक्यातील १८ हजार हेक्टर क्षेत्राला किमान १५ ते १६ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. महसूल आणि कृषी विभागाला दुष्काळी तालुक्यांमधील १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पीकपाणी शेतकरी गट आणि सर्व्हे नंबरच्या याद्या तयार करण्याचे आदेश दिले असल्याने यामुळे तलाठी आणि कृषी सहायक यांच्यावर मोठा ताण आला आहे.

Jowar Rate । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ज्वारीची आवक वाढताच दरात झाली मोठी घसरण, जाणून घ्या नवीन दर

दरम्यान, शासन निविष्ठा स्वरूपात मदत देण्याचा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना खते, बियाणे, औषधे इत्यादी मदत थेट मिळू शकेल. अशातच आता तालुक्यातील १०० टक्के जिरायत खरीप क्षेत्राच्या सरसकट शेतकऱ्यांच्या गट आणि सर्वे नंबरनुसार याद्या तयार करण्याच्या सूचना कृषी सहायकांना दिलेल्या आहेत.

Sugarcane Farmers । ऊस नको रे बाबा..! जळालेल्या उसाचं चिपाड झालं आता तरी त्याची तोडणी करा, शेतकऱ्यांची भावनिक साद

लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी

  • शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधून आपली नोंदणी असल्याची खात्री करून घ्यावी लागणार आहे.
  • हे लक्षात घ्या की केवळ शेतकऱ्यांनाच ई-पीक पाहणीमध्ये नोंदणी केलेल्या दुष्काळी सवलती मिळतील.
  • त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही नोंदणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळीच नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे जमा करा.

Gram Cultivation । शेतकऱ्यांनो, हरभऱ्यावर या औषधाचा करा वापर; होईल मोठा फायदा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *