Agriculture News । भारत हा कृषिप्रधान देश आहे. अनेक पिकांचे येथे उत्पन्न घेतले जाते. जर तुम्हाला शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला शेतीत खूप मेहनत करावी लागते. शेतकरी आता आधुनिक शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू लागले आहेत. परंतु शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज असते. अनेकदा मनुष्यबळाअभावी शेतीची कामे रखडली जातात.
वेळेवर पिकांवर औषधांची फवारणी (Spray Agriculture) करणे गरजेचे आहे. फवारणीसाठी खूप वेळ जातो. फवारणी (Spraying drugs) करणे काम खूप कष्टाचे आणि वेळखाऊ आहे. तसेच सतत मनुष्यबळाचा अभाव असतो. फवारणी अभावी बऱ्याचवेळा विविध प्रकारचे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होतो. परंतु यावर एका शेतकऱ्याने उपाय शोधून काढला आहे. शेतकऱ्याने फवारणीसाठी एक भन्नाट जुगाड शोधून काढला आहे.
Government Schemes । जगातील सगळ्यात मोठी DBT योजना! सोप्या पद्धतीने घ्या योजनेचा लाभ
असा आहे जुगाड
या जुगाडामध्ये दोन प्रकारचे पंप घेतले असून त्याला एक प्रकारची नळी जोडण्यात आली आहे. त्यावर एक स्टीलची नळी जोडली असून ही सेटिंग अशा पद्धतीने तयार केली आहे की त्याला दोन्ही बाजूने दोन माणसांना धरता येईल. त्या नळीच्या मध्यभागी खूप सारे फवारे पडतील अशी सोय केली आहे.
महत्त्वाचे म्हणजे हे जुगाड तुम्ही घरी कमी खर्चात तयार करू शकता. हे जुगाड बॅटरी चलीत पंपाच्या साह्याने तयार केले आहे, त्यामुळे तुम्हाला अवघ्या दोन माणसांच्या साह्याने फवारणी करता येईल. तुम्ही एकच दिवसात कमीत कमी दहा एकर शेती वरील पिकांची फवारणी करू शकता.
Sugar Factory । 1 नोव्हेंबरला पेटणार का कारखान्याचं धुराडं? मंगळवारी बैठकीत होणार निर्णय