Wheat Farming

Wheat Farming । ‘हे’ आहे गव्हाचे उत्तम वाण, पेरणी केल्यास मिळेल भरघोस उत्पादन

कृषी सल्ला

Wheat Farming । भारत हा कृषिप्रधान देश आहे. अनेक पिकांचे येथे उत्पन्न घेतले जाते. जर तुम्हाला शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला शेतीत खूप मेहनत करावी लागते. शेतकरी आता आधुनिक शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू लागले आहेत. दरम्यान, सध्या मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. नागरिकांना उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागत आहेत.

Agriculture News । फवारणीसाठी शेतकऱ्याचं अनोखं जुगाड! एक दिवसात 2 व्यक्तींना करता येणार 10 ते 15 एकर फवारणी

लवकरच हिवाळ्याचे दिवस सुरु होतील. यंदा हवामान खात्याने नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच थंडीची तीव्रता वाढेल अशी शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात रब्बी हंगामातील गहू (Wheat Farming Information) आणि हरभरा पीक पेरणीला सुरुवात होते. या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे त्यांना आता रब्बी हंगामाकडून अपेक्षा आहे. मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन घेतले जाते. जर तुम्ही गव्हाच्या काही जातींची लागवड केली तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. (Wheat Farming Cultivation)

Success story । गांडूळ खताचा यशस्वी प्रयोग! परदेशात निर्यात करून वर्षाला शेतकरी मिळवतोय 15 लाख रुपयांचं उत्पन्न

या आहेत गव्हाच्या उत्तम जाती

श्रीराम सुपर 111 : हे लक्षात घ्या की राज्यातील हवामान या जातीसाठी खूपच चांगले आहे. यापासून (Shri Ram Super 111) सरासरी 22 ते 30 क्विंटल पर्यंतचे उत्पादन घेता येते. या पिकाची उंची कमी असून हा वाण तांबेरा रोगास प्रतिकारक आहे.

Government Schemes । जगातील सगळ्यात मोठी DBT योजना! सोप्या पद्धतीने घ्या योजनेचा लाभ

मायको मुकुट : मायको (Mhayco) कंपनीचे मुकुट (Myco crown) हे वाण एक हायब्रीड वाण असून ते 105 ते 117cm पर्यंत वाढते. 25 ते 30 क्विंटल प्रति एकर उत्पादन यापासून मिळते. बाजारात याला मागणी असून हा वाण विविध रोगास प्रतिकारक आहे.

Success story । वडिलांसाठी तिनं सोडला आयटीचा 15 लाखांचा जॉब, आज शेतीतून करतेय कोट्यावधी रुपयांची उलाढाल

Bioseed 2005 : गव्हाचा हा एक सरळ वाण असून तुम्ही तो पुढील हंगामात बियाणे म्हणून वापरू शकता. जर तुम्ही पेरणी करताना प्रति एकर 40 किलो बियाणे वापरले तर चांगले उत्पादन मिळते. हा गहू (Bioseed 2005) 110 ते 120 दिवसात परिपक्व होतो.

Sugar Factory । 1 नोव्हेंबरला पेटणार का कारखान्याचं धुराडं? मंगळवारी बैठकीत होणार निर्णय

श्रीराम सुपर 303 : गव्हाची ही एक सुधारित जात (Shri Ram Super 303) आहे. ती 105 ते 120 दिवसात परिपक्व बनते. या जातीच्या पिकाची उंची कमी असून या जातीपासून 25 ते 30 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते. या बियाण्याची पेरणी करताना प्रति एकर 40 किलो बियाणे वापरावे.

Success story । सरलाताईंच्या जिद्दीला सलाम! कर्ज काढून फुलविली ‘ड्रॅगन फ्रूट’ची शेती, मिळवले १५ लाखांचं उत्पन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *