Government Schemes । प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना सतत वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशावेळी त्यांच्यावर आर्थिक संकट येते. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना आणत असते. ज्याचा त्यांना फायदा होत असतो. केंद्र सरकारची अशीच एक योजना आहे जिच्या मार्फत कोणत्याही व्याजाशिवाय कर्ज दिले जाते.
Wheat Farming । ‘हे’ आहे गव्हाचे उत्तम वाण, पेरणी केल्यास मिळेल भरघोस उत्पादन
या योजनेचे नाव आहे पीएम स्वनिधी योजना (PM Svanidhi Scheme). केंद्र सरकारकडून ही योजना देशातील रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी सुरू केली आहे. रस्त्यावर वस्तू विक्री करणाऱ्या लोकांना आर्थिक मदत करणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. विक्रेत्यांना कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना मिळणाऱ्या कर्जावर खूप कमी व्याज आकारण्यात येते.
महत्त्वाचे म्हणजे जर फेरीवाल्यांनी हे कर्ज वेळेत फेडले तर त्यांना व्याजात सवलत मिळते. कर्जाच्या मोबदल्यात आकारण्यात येणाऱ्या व्याजावर या योजनेअंतर्गत सबसिडी दिली जाते. या सबसिडीमुळे या योजनेअंतर्गत मिळणारे कर्ज बिनव्याजी होते. फेरीवाल्यांना 50,000 पर्यंत कर्ज मिळते. सर्वात अगोदर या योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना दहा हजार रुपयांचे कर्ज मिळते. समजा फेरीवाल्यांनी हे कर्ज योग्य वेळेत फेडल्यास दुसऱ्यांदा 20,000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. पुन्हा हे कर्ज फेडले तर लाभार्थ्यांना तिसऱ्यांदा 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.
लागणारी कागदपत्रं
- शिधापत्रिका
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मतदार ओळखपत्र
- पासबुकची झेरॉक्स
Government Schemes । जगातील सगळ्यात मोठी DBT योजना! सोप्या पद्धतीने घ्या योजनेचा लाभ
असा करा अर्ज
- अर्ज करण्यासाठी तुम्हाला pmsvanidhi.mohua.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.
- होमपेज Apply Loan 10k/Apply Loan 20k/Apply Loan 50k वर क्लिक करा.
- पुढे तुमचा मोबाईल नंबर नोंदवा.
- मोबाईलवर SMSच्या माध्यमातून एक OTP येईल.
- OTP ची पडताळणी झाल्यास तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशन फॉर्म समोर येईल.
- केंद्र सरकारने निश्चित केलेल्या स्वनिधी केंद्रांवर जाऊन संपूर्ण फॉर्म भरून तो सर्व आवश्यक कागदपत्रं स्कॅन करून अपलोड करावे.
- पडताळणीनंतर या योजनेंतर्गत कर्जाची रक्कम बँक खात्यात जमा होईल.