Crop Insurance

Crop Insurance । सरकारचा मोठा निर्णय! रब्बी हंगामातही मिळणार १ रुपयात पीक विमा

शासकीय योजना

Crop Insurance । शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. परिणामी त्यांच्यावर अनेकदा आर्थिक संकट देखील उभे राहते. साहजिकच डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढल्याने काही शेतकरी टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांच्या याच अडचणी लक्षात घेता सरकारने योजना राबवायला सुरुवात केली आहे. याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. यावर्षी पावसामुळे शेतीचे खूप नुकसान झाले.

Havaman Andaj । ढगाळ हवामान कायम! उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

१ रुपयात मिळणार पीक विमा

त्यामुळे सरकारने खरीप हंगामासाठी १ रुपयात पीक विमा योजना सुरु केली होती. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामात १ रुपयात पीक विमा (Rabi Season Meeting) मिळणार आहे. आज कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात रब्बी हंगामाची आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.

Grampanchyat Election । ग्रामपंचायत निवडणुक लढवायचीय? जाणून घ्या उमेदवारांच्या पात्रता आणि अपात्रता

दिवाळीपूर्वी मिळणार नुकसानभरपाई

धनंजय मुंडे बोलताना म्हणाले की, “राज्यात रब्बी हंगामातदेखील १ रुपयात पीक विमा योजना राबवली जाणार आहे. यात मका, ज्वारी, गहू, हरभरा आणि कांदा या पिकांचा समावेश असेल. शिवाय ज्या जिल्ह्यात २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला आहे, अशा मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतील नुकसानभरपाईच्या २५ टक्के अग्रीम दिवाळीपूर्वी दिली जाईल,” असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी केले.

Land Rule । तुकडेबंदी कायद्यात बदल! ‘इतक्या’ गुंठ्यांच्या जमीनीची करता येईल खरेदी आणि विक्री

“पावसामुळे या हंगामाचा पेरा घटणार आहे. मागील वर्षी पेरणी ६१.६७ लाख हेक्टरवर झाली होती. परंतु यावर्षी ती ५८.७६ लाख होईल. रब्बी हंगामासाठी लागणारी बियाणे आणि खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन दिली आहेत,” अशी माहिती देखील धनंजय मुंडे यांनी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Property Act । कामाची बातमी! काय असते साठेखत? शेतकऱ्यांसाठी का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *