Namo Shettale Abhiyan । शेतकऱ्यांसाठी राज्य आणि केंद्र सरकार वेळोवेळी मदत करत असते. ज्याचा फायदा त्यांना होतो. याचा देशभरातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून सरकार विविध योजना (Government Schemes) राबवत असते. सरकारने आता अशीच एक योजना आणली आहे, ज्याचा लाभ तुम्ही देखील सहज घेऊ शकता.
Sharad Pawar । मोठी बातमी! दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर
शेतीला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. जर पाणीच उपलब्ध नसेल तर पिकांना पाणी देणे अवघड होते. यावर्षी तर हिवाळा सुरु होण्यापूर्वी पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. अनेकजण शेततळे खोदतात. परंतु त्यासाठी देखील जास्त खर्च येतो. प्रत्येकाकडे पुरेशा प्रमाणात पैसे असतातच असे नाही. जर तुमच्याकडे देखील पैसे कमी असतील तर काळजी करू नका. आता तुम्ही सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊ शकता.
नमो शेततळे अभियान
सरकारमार्फत आता नमो शेततळे अभियान राबवले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या 73 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अकरा सुत्री कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच नमो शेततळे अभियान राबवण्यात येत आहे. अभियानाच्या माध्यमातून राज्यात तब्बल 73 शेततळे तयार केले जातील. मागेल त्याला शेततळे त्याचादेखील या अभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेततळ्यांमध्ये समावेश असेल.
Go Green Scheme । सोडू नका अशी संधी! वीजबिलात मिळेल सवलत, असा घ्या लाभ
विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत मागेल त्याला शेततळे या घटकासाठी उपलब्ध होणाऱ्या निधीमधूनच नमो शेततळे अभियान राबवले जाईल. छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेच्या मार्गदर्शक सूचना या नमो शेततळे अभियानासाठी असतील. दरम्यान, नमो शेततळे अभियाना संदर्भातील जीआर काढला आहे.
Krushi Seva Kendra । कृषी सेवा केंद्र सुरू करण्यापूर्वी जाणून घ्या नियम, येणार नाही कोणतीच अडचण