Sharad Pawar । दिवाळीला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. राज्यात यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. अशातच शेतमालाला हमीभाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या (Agriculture News) बांधावर जाणार आहेत. पवारांच्या उपस्थितीत कापसेवाडीत शेतकरी मेळावा पार पडणार आहे.
उस्मानाबाद, सोलापूर आणि सांगली या तिन्ही जिल्ह्यातील बेदाणा, दूध आणि टॉमॅटो उत्पादक शेतकरीवर्ग चांगलाच अडचणीत सापडला आहे. राज्यात 2 लाख 57 हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले असून त्यापैकी एकूण 94 हजार टन बेदाणा योग्य दर मिळत नसल्याने कोल्ड स्टोरेजमध्ये पडला आहे. बेदाण्यावरील निर्यात शुल्क कमी करुन आयात शुल्क वाढवा, अशी शेतकऱ्यांमधून मागणी जोर धरू लागली आहे.
Go Green Scheme । सोडू नका अशी संधी! वीजबिलात मिळेल सवलत, असा घ्या लाभ
जाणून घेणार शेतकऱ्यांच्या समस्या
द्राक्षांचे दर पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा तयार केला. परंतु बेदाण्याचेही दर कोसळले आहेत. त्यात टॉमेटोचे दर कोसळले आहेत. दुध उत्पादक कमी दरामुळे संकाटात आले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शरद पवार कापसेवाडीत येणार आहेत. 23 ऑक्टोबरला पवार कापसेवाडीत येणार होते. परंतु त्यांचा अचानक दौरा रद्द झाला. 16 नोव्हेंबरला शरद पवार कापसेवाडीत येतील, अशी माहिती कृषीनिष्ठ परिवाराचे नितीन कापसे यांनी दिली आहे.
Success Story । भारीच! उच्च शिक्षित बंधूंनी मधमाशी पालन करत केली ४० लाखांची उलाढाल
23 ऑक्टोबरला शरद पवार यांचा दौरा अचानक रद्द झाला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. शरद पवार या दिवशी थेट पुण्याला रवाना झाले होते. परंतु, अजूनही त्यांचा हा दौरा अचानक का रद्द झाला, याबद्दल कोणतेही कारण समोर आले नाही. दौरा रद्द झाल्यानं शेतकरी त्यांच्यावर नाराज झाले होते.
Agricultural Tips । घरबसल्या मिनिटात समजेल खत दुकानांमध्ये खत शिल्लक आहे की नाही, फक्त करा ‘हे’ काम