Onion Crop । महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादक शेतकर्यांवर कांदा कवडीमोल दरात (Onion Price) विकण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी नाफेडने अडीच लाख टन कांद्याची खरेदी केल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला. परंतु, पुन्हा हाच कांदा पु्न्हा बाजारात दाखल होत असल्याने दर कमी (Onion Price Falls Down) झाले आहेत. काही शेतकऱ्यांना कांदा परवडत नसल्याने ते कांदा शेतात फेकून देत आहे.
Governmnet Schemes । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बांबू लागवडीसाठी मिळणार हेक्टरी 7 लाखांचं अनुदान
सध्या कांद्याचे दर इतके कमी झाले आहेत की त्यातून उत्पादन खर्चही निघणं कठीण झाले आहे. असे असतानाही राज्यभर कांदा लागवड (Onion cultivation) आणि पेरणी केली जात आहे. परंतु, कांद्याच्या रोपांची किंमत (Onion crop price) खूप वाढली आहे. रोपाची टंचाई शेतकऱ्यांना जाणवू लागली आहे. कांद्याची रोपे सोन्याच्या किमतीत विकली जात आहेत, असं म्हटले तरी वावगे ठरणार नाही. (Onion farming)
Grain Dryer । मस्तच! बाजारात आले स्वस्त धान्य वाळवणी यंत्र, किंमत आहे फक्त ‘इतकीच’
पावसाअभावी शेतकऱ्यांचे कोलमडले नियोजन
प्रत्येक वर्षी कांद्याचे दर पडलेले असतातच असे नाही. अनेकदा कांद्याचे दर वाढलेले असतात. त्यामुळे कांदा उत्पादकांची चांदी होते. दर कमी झाल्याने कांदा शेतकऱ्यांना रडवतो. यावर्षी पावसाने हुलकावणी दिली. याचा परिणाम सर्वच पिकांवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांचे नियोजन पावसाअभावी पिकांचे नियोजन संपूर्णपणे कोलमडून गेले आहे.
Milk Price । राज्यात दुधाचे दर का कमी होतात? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
रोपांची टंचाई
अनेक शेतकऱ्यांनी पाणीच उपलब्ध नसल्याने कांदा रोपे टाकली नाही. याच कारणामुळे रोपांची किंमत यंदा गगनाला भिडली आहे. थोड्याफार प्रमाणात कांद्याचे बाजारपेठ सुधारत असून लाल कांद्यास किमान चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कांदा लागवड करण्यास गडबड केली आहे. बऱ्याच ठिकाणी लागवड सुरु झाली असून कांद्याच्या रोपांची टंचाई जाणवत आहे.
सध्या कांद्याच्या रोपांना चांगली मागणी आणि दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रोप लागवडीसाठी मागणीत चढ-उतार होत आहे. यावर्षी कांद्याचे दर कमी झाले असले तरी रोपांची किंमत वाढली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.