Grain Dryer । शेतीत नवनवीन प्रयोग शेतकरीवर्ग करत आहेत. ज्याचा त्यांना फायदा होतो. शेतकरी आता पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक पिकांची लागवड करत आहेत. शेतीत आता कामे सोयीस्कर होण्यासाठी विविध यंत्रे (Agriculture machine) बाजारात येऊ लागली आहेत. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे, यंत्रांमुळे (Machine) कामे चुटकीसरशी होऊ लागली आहेत. सध्या खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरु आहे.
Milk Price । राज्यात दुधाचे दर का कमी होतात? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
या पिकांवर अवकाळी पावसाचे सावट आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. बाजारात एक धान्य वाळवणी यंत्र आले आहे. या यंत्राच्या माध्यमातून तुम्ही मका वाळवू शकता. याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. ग्रेन ड्रायरचा वापर (Use of grain dryers) शेतकरी मका आणि इतर धान्य वाळवण्यासाठी करत आहेत. जाणून घेऊयात या यंत्राबद्दल. (Grain Dryer Price)
ग्रेन ड्रायरचा वापर
ग्रेन ड्रायर हे तांदूळ, मका, गहू आणि इतर यांसारख्या कापणी केलेल्या धान्यांचा ओलावा कमी करण्यासाठी शेतीमध्ये वापरण्यात येणारे यंत्र आहे. कापणीनंतर, धान्यांमध्ये अनेकदा उच्च आर्द्रता असल्याने साठवण दरम्यान धान्य खराब होण्याची शक्यता जास्त असते. ग्रेन ड्रायरचा वापर अतिरिक्त ओलावा काढून टाकण्यास, गुणवत्ता राखण्यास आणि क्षय रोखण्यास मदत करते.
ग्रेन ड्रायरचे प्रकार
ग्रेन ड्रायरचे देखील प्रकार (Grain Dryer Types) असतात. बिन ड्रायर, टॉवर ड्रायर आणि सतत प्रवाह ड्रायरसह वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेन ड्रायर आहेत. गरम हवा किंवा उष्णता आणि हवेच्या प्रवाहाचा वापर करतात ज्यामुळे धान्यातील ओलावा कमी होतो. प्रक्रियेमध्ये ग्रेन ड्रायरमध्ये लोड करणे, त्यांच्याद्वारे गरम हवा फिरवणे आणि नंतर ओलावा असणारी हवा काढून टाकली जाते.
Eucalyptus Farming । ‘या’ एका झाडाची लागवड केल्यास शेतकरी होईल मालामाल; खर्च कमी आणि लाखोंचा नफा
किंमत
सर्वात महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी ग्रेन ड्रायरची किंमत शेतकऱ्यांच्या बजेटबाहेर होती. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना ते खरेदी करता येत नाही. परंतु आता तुम्ही ते तुमच्या बजेटमध्ये सहज खरेदी करू शकता. कारण या यंत्राची किंमत आता २० ते २५ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. या यंत्रामुळे अवघ्या पाच ते सहा तासात मका वळवली जाईल. सध्या देशात हे यंत्र उपलब्ध नाही. यासाठी लवकरच बिहार विद्यापीठाकडून नालंदा कंपनीसोबत करार केला जाणार आहे.